नक्की पाहावा असा २१ वा ‘मामि’ अर्थात मुंबई फिल्म फेस्टिवल २०१९

तुम्हाला जर आंतरराष्ट्रीय चित्रपट पाहायला आवडत असेल तर दर्जेदार आंतरराष्ट्रीय चित्रपटांचा समावेश असणारा एक चित्रपट महोत्सव येत्या १७ ते २४ ऑक्टोबर दरम्यान मुंबईत पार पडणार आहे. त्याचं नाव आहे मामि अर्थात मुंबई फिल्म फेस्टिवल २०१९.

मामि अर्थात मुंबई फिल्म फेस्टिवलचे हे २१ वे वर्ष आहे. या चित्रपट महोत्सवाची एक खूप महत्वाची खासियत म्हणजे, तुम्हाला जो चित्रपट पाहायचा आहे त्याचे तुम्ही ऑनलाईन बुकिंग करू शकता. आपल्याकडे जे इतर आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल पार पडतात, त्यामध्ये आणि ‘मामि’ मध्ये हाच एक महत्वाचा असा फरक आहे. म्हणजे उदाहरणादाखल पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणजेच पिफ मध्ये तुम्हाला फिल्म पाहण्यासाठी सिनेमागृहात स्क्रीनबाहेर मोठ्या रांगा लावाव्या लागतात/ स्क्रीनची प्रेक्षक क्षमता संपल्यावर तुम्हाला तो चित्रपट पाहता येत नाही. पण मामि मध्ये तुम्ही तुमच्या मोबाईलवरून ऑनलाईन ऍप द्वारे जो चित्रपट पाहायचा आहे त्याचं बुकिंग करू शकता. सिनेमागृहात गेल्यानंतर तुमच्या कडे असलेल्या पास वरील बारकोड स्कॅन केल्यावर लगेच तुम्हाला आत प्रवेश मिळतो. उगाचच ताटकळत रांगेमध्ये उभं राहावं लागत नाही.

या ऑनलाईन बुकिंगच्या एकमेव यूएसपी साठी तुम्ही मामिचे रजिस्ट्रेशन करू शकता. रजिस्ट्रेशन केल्यानंतर दर्जेदार अशा आंतरराष्ट्रीय चित्रपटांचा तुम्हाला खुला होईल.मामि या चित्रपट महोत्सवाची दुसरी खासियत म्हणजे मुंबईतील पीव्हीआर मल्टिप्लेक्स मध्ये तुम्हाला दर्जेदार असे आंतरराष्ट्रीय चित्रपट पाहायला मिळतात.

सो, मित्रांनो येत्या १७ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर दरम्यान फ्री असाल तर नक्की मामि २०१९ अर्थात मुंबई फिल्म फेस्टिवल अटेंड करा. रजिस्ट्रेशन फी आहे ५०० रुपये. त्यामुळे जर तुम्हाला परवडणार असेल तर नक्की रजिस्टर करा. दर्जेदार अशा आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध देशांमधील फिल्म्स पाहून तुमच्या जाणिवा प्रगल्भ करण्याची ही संधी दवडू नका.

रजिस्ट्रेशन आणि अधिक माहितीसाठी पुढील लिंकवर क्लिक करा
https://in.bookmyshow.com/events/jio-mami-21st-mumbai-film-festival-with-star-2019/ET00110173

– अमोल कचरे

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here