पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारी 4 फूट व्यासाची मुख्य जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेलं आहे. चिंचवड स्टेशन ते आकुर्डी स्टेशन दरम्यान असलेल्या पांढरकरनगर परिसरात दुपारी तीनच्या सुमारास ही जलवाहिनी फुटली आहे.
ही जलवाहिनी कश्यामुळे फुटली याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. मोठ्या प्रमाणावर पाणी या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांच्या घरात शिरल्याने त्यांच्या घरातील वस्तूंचे नुकसान झाले आहे.