‘या’ महिन्यात महाविकास आघाडी सरकार कोसळेल

मुंबई: राजस्थान, मध्यप्रदेश नंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार असल्याचे भाजपनेते नेहमी बोलताना दिसले. दरम्यान, आता पुन्हा एकदा भाजप खासदाराने महाविकास आघाडी सरकार सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंतच टिकणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे भाजपा मिशन महाराष्ट्रा’साठी फिल्डिंग लावत असल्याचे स्पष्ट होत आहे.

महाविकास आघाडीत एकमत नाही, तिन्ही पक्षांच्या भूमिका वेगळ्या असल्यामुळे हे सरकार फार काळ टिकणार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंतच हे सरकार राहील, असे भाकीत सुद्धा त्यांनी केले आहे.

सध्या सरकार चालत नाही, प्रत्येक पक्षात वाद आहेत, महाविकास आघाडीत एकमत नाही. त्यामुळे सरकार चालणार कसं? जेमतेम हे सरकार सप्टेंबरपर्यंत चालू शकेल असा दावा त्यांनी केला आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

दरम्यान, राणे यांनी सुशांतसिंह प्रकरणावरून शिवसेनेवर निशाणा साधला आहे. सुशांत सिंग प्रकरणाला कलाटणी देण्यासाठी शिवसैनिक आंदोलन करत आहे लोकांचे लक्ष मुख्य विषयाकडून वळवायचं त्यासाठी हा वाद पेटवला जात असल्याचे राणे म्हणाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.