तरच न्या. लोया प्रकरणाचा पुन्हा तपास : मलिक

मुंबई : जर पुरेशा पुराव्यासह तक्रार दाखल झाली तर महाराष्ट्र सरकार सीबीआयचे न्यायधिश बी. एच. लोया यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा तपास करण्याचा विचार करेल, असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे मंत्री नबाब मलिक म्हणाले.

न्या, लोया यांच्यापुढे सोहराबुद्दीन शेख यांच्या बनावट चकमकीचा खटला सुरू होता. त्यावेळी ते आपल्या सहकाऱ्याच्या मुलीच्या विवाहासाठी नागपूरला आले होते. त्यावेळी त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. याबाबत पक्षाच्या मंत्र्यांच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलाताना मलिक म्हणाले, जर कोणी पुरेशा पुराव्यासह तक्रार दाखल केली तर या प्रकरणाचा पुन्हा तपास होऊ शकतो.

जर पुरेशा पुराव्यासह कोणी तक्रार केली तरच याचा तपास होऊ शकतो, अन्यथा या प्रकरणाचा फेरतपास होणार नाही, असे ते म्हणाले.

शिवसेना राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे सरकार स्थापन केल्यानंतर शरद पवार यांना लोया प्रकरणाचा तपास होऊ शकतो का असे विचारले होते, त्यावेळी पवार यांनी या न्यायधिशाच्या मृत्यूचा पुन्हा तपास करणे शक्‍य असल्याचे सांगितले होते. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही तसे संकेत दिले होते, असे ते म्हणाले.

एक डिसेंबर 2014 ला न्यायमुर्ती लोया यांचा झालेला मृत्यू नैसर्गिक होता. त्यामुळे त्याची विशेष तपास पथकामार्फत चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली होती. ही याचिका राजकीय हेतूने प्रेरीत असल्याचे सर्वोच्च न्यालयाने म्हटले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.