स्वॅब घ्यावे की नाही हे मशिन सांगणार – आमदार जगताप

सासवडमध्ये प्रायोगि तत्त्वावर मशिन बसवले

पुणे – करोनाबाबत स्वॅब कोणाचे घ्यावेत वा न घ्यावेत, हे आता मशीनद्वारे समजणार आहे. या मशिनद्वारे सर्वांची तपासणी करण्यात येणार येणार अशी माहिती पुरंदर-हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी सांगितले.

सासवड शहरातील कंटेन्मेंट परिसरात 23 प्रकारची तपासणी करून लगेच अहवाल देणारे बहुउद्देशीय शारीरिक तपासणी मशिन सासवड (ता. पुरंदर) येथील लांडगेआळी येथील क्‍लाउड क्‍लिनिक येथे आमदार संजय जगताप यांच्या सहकार्याने सुरु करण्यात आले असून त्याचा शुभारंभ आमदार जगताप याम्च्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी नगरपालिका आरोग्य अधिकारी मोहन चव्हाण, नगरसेवक अजित जगताप, नंदकुमार जगताप उपस्थित होते. आमदार जगताप म्हणाले की, हे मशीन प्रायोगिक तत्त्वावर सुरू केले असून त्याच्या यशस्वीतेनंतर पुरंदर व हवेली तालुक्‍यात 6 ठिकाणी मशीन बसवण्यात येणार आहे. करोनाबाधीतांचा सहजपणे शोध घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.

मशिन करणार आता 23 चाचण्या
वजन, उंचीसह शरीरातील तापमान, ऑक्‍सिजन, हाडाची ठिसूळता, रक्‍तदाब, नेत्रस्थिती, कोणत्या घटकाची कमतरता, पाण्याचे प्रमाण, प्रोटिन्स, चरबी, दोष आदी माहिती समजणार आहे.
सासवड (ता. पुरंदर) : येथे मशिनद्वारे तपासणी करताना नागरिक.

Leave A Reply

Your email address will not be published.