नगरचा किमान पारा राज्यात नीचांकी

सोमवारपर्यंत मराठवाड्यात पावसाचा अंदाज

नगर – नगरचा किमान पारा पुन्हा घसरला असून, त्याची आज गुरूवारी राज्यात सर्वात नीचांकी नोंद झाली आहे. किमान तापमान 9.9 अंश सेल्सिअस एवढे नोंदविले गेले आहे. मध्य महाराष्ट्रत किंचित थंडीची लाट आहे. नगरच्या किमान तापमानात त्यामुळे घट नोंदवली गेली आहे. ही लाट काही काळच आहे. थंडी फक्त सायंकाळी जाणवेल, असा स्थानिक हवामान अभ्यासकांचा अंदाज आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मध्य महाराष्ट्र, विदर्भ, कोकण गोवा या भागात हवामान कोरडे आहे. त्यामुळे हवा वेगाने वाहत आहेत. त्यातूनच काही स्थानिक भागात थंडी जणावत आहे. नगरला देखील याच कारणातून थंडीची लाट आहे. ही स्थानिक लाट असल्याने ती लवकरच ओसणारी आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 11 फेब्रुवारीपर्यंत काही ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याचा अंदाज आहे. पुणे, महाबळेश्‍वर येथील तापमान नगर खालोखाल नीचांकी नोंदवले गेले आहे. राज्यात इतरत्र ठिकाणी किमान तापमान सर्वसामान्य आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)