तुमचा स्तर जितका खालावेल, तितके आम्ही उंच भरारी घेऊ

सय्यद अकबरुद्दीन यांनी पाकिस्तानला सुनावले खडेबोल

नवी दिल्ली : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान 27 सप्टेंबर रोजी संयुक्त राष्ट्राच्या महासभेत काश्‍मीरचा मुद्दा उपस्थित करणार आहेत. यादरम्यान संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी पाकिस्तानला खडेबोल सुनावले आहेत. काश्‍मीर मुद्द्यावर पाकिस्तान जितक्‍या खालच्या स्तराला जाण्याचा प्रयत्न करेल, तितकीच भारताची मान उंचावेल, अशा शब्दांत सय्यद अकबरुद्दीन यांनी पाकिस्तानवर हल्लाबोल केला आहे.

सय्यद अकबरुद्दीन यांनी न्यूयॉर्कमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी पाकवर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बहुपक्षीय आणि द्विपक्षीय बैठका आणि व्यस्ततेवरुन भारत किती उंच भरारी घेत आहे हे अधोरेखित होत आहे. त्यांनी काय हवे आहे ही त्यांची इच्छा आहे. आम्ही दहशतवाद पाहिला आहे, आता ते द्वेषयुक्त भाषण देऊ शकतात, असेही सय्यद अकबरुद्दीन यांनी म्हटले आहे. सय्यद अकबरुद्दीन यांनी, संयुक्त राष्ट्रांपुढे एक देश पुन्हा एकदा त्याच मुद्द्याची पुनरावृत्ती करणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वत:ला कसं सादर करावं यासाठी प्रत्येक देशापुढे पर्याय असतो. पण काही देश आपलं म्हणणं मांडण्यासाठी खालच्या स्तराला जाऊ शकतात. पण आमचा स्तर उंचावेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. तुमचा स्तर जितका खालावेल, तितके आम्ही उंच भरारी घेऊ असे म्हटले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here