जमशेदपुर: झारखंडच्या सेराईकेला खारसवान जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या आयईडी स्फोटात भाजप कार्यालयाचे अंशता नुकसान झाले. नक्षलवाद्यांनी हा स्फोट घडवला. तथापी त्यात कोणी जखमी झाल्याचे वृत्त नाही. शुक्रवारी सकाळच्यावेळी चार शस्त्र धारी इसम त्या कार्यालयात आले. त्यावेळी तेथे झोपलेल्या दोन-तीन जणांना त्यांनी हुसकाऊन बाहेर काढले. आणि त्यानंतर त्यांनी हा स्फोट घडवला.
स्फोटाची माहिती मिळताच पोलिसांचे पथक त्या ठिकाणी दाखल झाले त्यांनी लगेच आजूबाजुला आणखी स्फोटके पेरण्यात आली आहेत किंवा कसे याचा अंदाज घेतला. ज्या भागात हा स्फोट झाला तो भाग खुंती संसदीय क्षेत्रात येतो. येथे सहा मे रोजी मतदान होणार असून माजी मुख्यमंत्री व भाजपचे उमेदवार अर्जुन मुंडा हे येथून निवडणूक लढवत आहेत.