नवी दिल्ली: सोमवारी स्वीडनचा राजा किंग कार्ल सोळावे गुस्ताफ आणि क्वीन सिल्व्हिया सोमवारी दिल्लीत दाखल झाले. रॉयल जोडप्याने स्टॉकहोमहून एअर इंडियाच्या विमानातून उड्डाण केले. एअर इंडियाने आपल्या ट्विटर हँडलवरून दिल्लीच्या विमानतळावर या दोघांची छायाचित्रे शेअर केली आहेत. यानंतरच स्वीडिश रॉयल जोडप्याने स्वत:च्या बॅग स्वत:च घेतल्याचे छायाचित्रे व्हायरल झाले.
अशा प्रकारे स्वीडनचा राजा पाहून लोक सोशल मीडियावर त्यांचे कौतुक करीत आहेत. स्वीडनच्या राजाने स्वत: पिशव्या उचलताना पाहिल्यावर ट्विटरवर लोकांनी त्यांचे खूप कौतुक केले आणि त्यांचे प्रेरणादायक व नम्र म्हणून वर्णन केले.
#FlyAI : Very Proud moment of Air India when we had a Special Guest onboard. His Majesty Carl Gustaf Folke Hubertus , King of Sweden and Her Majesty Silvia Renate Sommerlath travelled AI168 Stockholm to Delhi. Ms. Sangeeta Sanyal Country Manager Sweden greeted the Royal guests. pic.twitter.com/LXrLeEoDqd
— Air India (@airindiain) December 2, 2019
सोमवारी सकाळी पाच दिवसांच्या दौऱ्यावर भारतात आलेल्या शाही दाम्पत्याचे राष्ट्रपती भवनात औपचारिक स्वागत करण्यात आले. त्यांचा जामा मशिदी, लाल किल्ला आणि दिल्ली येथील गांधी स्मृती येथे जाण्याचा कार्यक्रम आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, स्वीडनच्या राजाच्या या भेटीदरम्यान द्विपक्षीय संबंध आणखी वाढवण्यासाठी अनेक कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या केल्या जाऊ शकतात. भारत आणि स्वीडनमधील संबंध गेल्या काही वर्षांत वाढत चालले आहेत. 2018 मध्ये दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार 3.37 अब्ज डॉलर्स होता.
Inspiring to see a king travel by a commercial service and that too of another country’s airline. In these times of economic slowdown can India’s leaders not demonstrate the same frugality?
— Bangalore Aviation (@BLRAviation) December 2, 2019