-->

#IPL : बहुप्रतिक्षीत लिलाव आज

एकूण 291 खेळाडूंवर लागणार बोली

चेन्नई –आयपीएलच्या यंदाच्या मोसमासाठीचा बहुप्रतिक्षित लिलाव गुरुवारी होणार आहे. या लिलावात आठ संघ एकूण 292 खेळाडूवर बोली लावणार आहेत.

लिलावात 164 खेळाडू भारतीय आहेत. 35 खेळाडू ऑस्ट्रेलियाचे, न्यूझीलंडचे 20, वेस्ट इंडिजचे 19, इंग्लंडचे 17, दक्षिण आफ्रिकेचे 14, श्रीलंकेचे 9, अफगाणिस्तानचे 7 व नेपाळ, अमिराती आणि अमेरिकेचे प्रत्येकी 1 खेळाडू लिलावात सहभागी होणार आहेत. या लिलावासाठी सर्वाधिक पैसे पंजाब किंग्जकडे आहेत.

पंजाबकडे 53.20 कोटी इतकी रक्कम आहे. त्यानंतर राजस्थान रॉयल्सकडे 37.85 कोटी तर, विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडे 35.40 कोटी इतकी रक्कम शिल्लक आहे. लिलावात सर्वात कमी रक्‍कम कोलकाता नाइट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्याकडे आहे.

या वर्षीच्या लिलावात स्टार खेळाडूंना विविध संघांनी रिलीज केल्यामुळे ते लिलावासाठी उपलब्ध झाले आहेत. ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ, भारताचे केदार जाधव व हरभजन सिंग, बांगलादेशचा शाकिब अल हसन, इंग्लंडचा मोइन अली यांचा समावेश आहे. या सर्व खेळाडूंची किमत 2 कोटी इतकी आहे. त्याचबरोबर गेल्या मोसमात अपयशी ठरलेला ग्लेन मॅक्‍सवेल, सॅम बिलिंग्स, मार्क वुड, लियाम प्लंकेट, जेसन रॉय हेदेखील दोन कोटीच्या बेस प्राइसवर आहेत. मुंबई इंडियन्स संघाने सर्वाधिक 18 खेळाडूंना रिटेन केले आहे तर, सात खेळाडूंना रिलीजही केले आहे. ते 15.35 कोटी रुपयांत आता नवे सात खेळाडू विकत घेऊ शकतात. त्यात 3 भारतीय तर, 4 परदेशी खेळाडूंना ते विकत घेऊ शकतील.

विविध संघांकडे असलेली रक्‍कम

पंजाब किंग्ज – 53.20 कोटी
राजस्थान रॉयल्स – 37.85 कोटी
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू – 35.40 कोटी
चेन्नई सुपर किंग्ज – 19.90 कोटी
मुंबई इंडियन्स – 15.35 कोटी
दिल्ली कॅपिटल्स – 1.40 कोटी
कोलकाता नाइट रायडर्स – 10.75 कोटी
सनरायजर्स हैदराबाद – 10.75 कोटी

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.