लोकसभेला 35 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त

नगर – नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत 19 उमेदवार खासदारकीच्या रिंगणात उतरले होते. तर शिर्डी लोकसभा मतदार संघात 20 उमेदवारांनी नशिब अजमावले होते. या दोन्ही मतदार संघात 39 उमेदवार लोकसभेच्या रिंगणात उतरले होते. त्यापैकी 35 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली असून नगर दक्षिणचे 17 तर शिर्डीचे 18 उमेदवारांचा समावेश आहे.

नगर दक्षिण लोकसभा मतदार संघासाठी 25 हजार अनामत रक्कम उमेदवारांकडून घेण्यात आली होती. तर शिर्डी लोकसभा मतदार संघ आरक्षित असल्याने 12 हजार 500 रुपये प्रत्येक उमेदवारांकडून निवडणूक आयोगाने जमा करून घेतली होती. या उमेदवारांना एकूण मतदानाच्या षष्टाअंश मते मिळविणे गरजेचे होते. परंतु दोन्ही मतदार संघाचे चार उमेदवार सोडात बाकी सर्व उमेदवारांची अनामत जप्त करण्यात आली आहे.

नगर लोकसभा मतदार संघात उमेदवार नामदेव वाकळे, कळीराम पोपळघट, धीरज बाताडे, फारूक शेखे, सुधाकर आव्हाड, संजय सावंत, आप्पासाहेब पालवे, कमल सांवत, दत्तात्रय वाघमोडे, भास्कर पाटोळे, रामनाथ गोल्हार, आबीद शेख, साईनाथ घोरपडे, नरहरी सुपेकर, संजीव भोर, संदीप सकट, श्रीधर दरेकर यांची अनामत रक्कम जप्त करण्यात आली आहे.

शिर्डी मतदार संघातील उमेदवार बंन्सी सातपुते, सुरेश जगधने, अशोक जाधव, प्रकाश आहेर, विजय घाटे, संजय सुखदान, गोविंद अमोलीक, अशोक वाकचौरे, किशोर रोकडे, गणपत मोरे, प्रदीप सरोदे, बापू रंधीर, शंकर बोरगे, भाऊसाहेब वाकचौरे, भाऊसाहेब राजाराम वाकचौरे, सचिन गवांदे, सुभाष त्रिभूवन, संपत समिंदर यांची जमानत रक्कम जप्त करण्यात आली आहे. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून भाजपचे डॉ. सुजय विखे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांचा पावणेतीन लाख मतांनी पराभव केला. शिर्डी मतदारसंघातून शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी कॉंग्रेसचे आ. भाऊसाहेब कांबळे यांचा 1 लाख 19 हजार 336 मतांनी पराभव केला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here