- यशस्वी आयोजन
- 17,30,41,539 रुपये महसूल जमा
पिंपरी – पिंपरी चिंचवड न्यायालय व पुणे जिल्हा विधी प्रधिकरण व पिंपरी चिंचवड ऍडव्होकेट बार असोशिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने राष्ट्रीय लोकअदालीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये पिंपरी न्यालायात 351 खटले निकाली काढण्यात आले. त्यामध्ये 4,29,75,429 रुपये महसूल जमा झाला. तर आकुर्डी पालिका न्यायालयात 6915 खटले निकाली काढत13,00,66,110 रुपये महसूल जमा झाला. या दोन्ही ठिकाणी एकूण 7266 खटले निकाली काढण्यात आले. तर 17 कोटी, 30 लाख, 41 हजार 539 रुपये महसूल जमा झाला.
पिंपरी न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश डी. आर. पठाण, आर. एस. वानखेडे, आर. आर.काळे , पी.सी. फटाले, एन. टी.भोसले उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, उपायुक्त चंद्रकांत इंदलकर, सहाय्यक पोलीस आयुक्त सागर कवडे व पिंपरी चिंचवड ऍडव्होकेट बार असोशिएशनचे अध्यक्ष ऍड. गोरखनाथ झोळ उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व भारतीय संविधान यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर दीपप्रज्वलन झाल्यानंतर कार्यक्रमाने सुरवात झाली .
पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी मार्गदर्शन करताना लोकअदालत व त्याचे महत्व सांगितले व जास्तीतजास्त नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन केले. यावेळी आकुर्डी न्यायालयात सर्वात जास्त खटले निकाली व जास्तीत जास्त महसूल जमा करून लोकन्यायालयाचा नागरिकांना लाभ मिळवून दिल्याबद्दल न्यायाधीश कुलकर्णी यांचा बारचे अध्यक्ष ऍड. गोरखनाथ झोळ व कार्यकरिणीच्या वतीने सत्कार करण्यात आला. सरकारी वकील ऍड. साधना बोरकर यांना पुणे न्यायालयात बढती मिळाल्याबद्दल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या लोकअदालतीमध्ये पॅनल जज म्हणून ऍड. पल्लवी विघ्ने, ऍड. शुभांगी थोरात, ऍड. माधुरी दाते, ऍड. श्वेता निमसे, ऍड.मेघा पवार, ऍड. सारिका मोरे, ऍड. कांता गोरडे, ऍड. पूनम राऊत, ऍड.अविनाश पाटील, ऍड. संतोष मोरे, ऍड. शुभांगी थोरात, ऍड. श्रध्दा मंचरकर, ऍड. भाग्यश्री झुळूक, ऍड. संकल्पा वाघमारे यांनी काम पाहिले.
ऍड. सतीश गोरडे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड. सुहास पडवळ यांनी केले तर सचिव ऍड. महेश टेमगिरे यांनी आभार मानले.
सदर कार्यक्रमाचे नियोजन पिंपरी चिंचवड डव्होकेटस् बार असोशिएशनचे अध्यक्ष ऍड. गोरखनाथ झोळ, उपाध्यक्ष ऍड. पांडुरंग शिनगारे, सचिव ऍड. महेश टेमगिरे, महिला सचिव ऍड. मोनिका गाढवे, सहसचिव ऍड. अनिल शिंदे, खजिनदार ऍड. हरीष भोसुरे, ऑडिटर ऍड. धनंजय कोकणे, सदस्य ऍड. ऋतुराज आल्हाट, ऍड.अमित गायकवाड, ऍड. मंगेश नढे, ऍड. दिनेश भोईर, ऍड. प्राची शितोळे, ऍड. कृष्णा वाघमारे यांनी केले होते.