नवी दिल्ली – संपूर्ण जगभरातील नागरिक कोणाला आपला आदर्श मानतात यासंदर्भात ब्रिटन मधील “योगोव्ह” या आंतराष्ट्रीय कंपनीने एक सर्वे केला आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही या कंपनीने जगभरातील आदर्श व्यक्तींची एक यादी तयार केली असून, यामध्ये प्रभावशाली 20 पुरुष आणि 20 महिलांचा समावेश करण्यात आला.
T 3231 – Filled with humble thanks and gratefulness to all ..????❤️❤️ pic.twitter.com/Cr6CKXonZN
— Amitabh Bachchan (@SrBachchan) July 20, 2019
यादीमध्ये मायकोसॉफ्टचे सह-संस्थापक ‘बिल गेट्स’ हे पहिल्या स्थानी कायम आहेत. मात्र या यादीमध्ये बॉलिवूडचे महानायक “अमिताभ बच्चन” 12व्या स्थानी आहेत. दरम्यान, बच्चन यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून योगोव्ह कंपनीचे आभार देखील मानले. यादीमध्ये अभिनेता शाहरुख खान (16व्या स्थानी), सलमान खान (18व्या स्थानी) यांचा देखील समावेश आहे.