डिज्नी प्रोडक्शन असलेल्या “द लायन किंग’ च्या हिंदी आवृत्तीपुढे बॉलिवूडची क्वीन कंगणा रणावतच्या “जजमेंटल है क्या’ने सरळ सरळ शरणागती पत्करली आहे. “द लायन किंग’ रिलीज होऊन दुसरा आठवडा सुरू झाला आहे. शनिवारी या सिनेमाने 11 कोटी रुपयांचा धंदा केला तर आतापर्यंत शंभर कोटींचा टप्पा ओलांडला होता.
या आठवड्यात रिलीज झालेल्या “जजमेंटल है क्या’ आणि “अर्जुन पटियाला’ने या “लायन किंग’पुढे आपला पराभव मान्य केला आहे. कंगणाच्या “जजमेंटल…’ची शुक्रवारची कमाई केवळ 5 कोटी होती. “मणिकर्णिका’पेक्षा “जजमेंटल’ला जास्ती ओपनिंग मिळेल, असा अंदाज होता. “मणिकर्णिका’ला पहिल्याच दिवशी 8 कोटींचे ओपनिंग मिळाले होते. राजकुमार रावसाठी मात्र “जजमेंटल…’चे हे ओपनिंग “एक लडकी को देखा…’पेक्षा निश्चितच चांगले आहे.
दुसरीकडे “अर्जुन पटियाला’नेही आतापयंत जेमतेम 7 कोटी रुपयांचाच धंदा करता आलेला आहे. मात्र “द लायन किंग’ला दुसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीला 11 कोटींचा धंदा मिळाला. “कॅप्टन मार्व्हल’ आणि “अव्हेंजर्स एंडगेम’नंतर वर्षातील तिसरा सर्वाधिक कमाईचा सिनेमा ठरण्याची संधी आहे.