“दूरस्थ’च्या प्रवेशासाठी लिंक 27 ऑगस्टपासून उपलब्ध

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुक्त अध्ययन प्रशालेमार्फत सुरू करण्यात येणाऱ्या दूरस्थ अभ्यासक्रमांचे (डिस्टंट एज्युकेशन) प्रवेश घेण्यासाठी विद्यापीठाच्या मुख्य संकेतस्थळावर मुक्त अध्ययन प्रशालेच्या (स्कूल ऑफ ओपन लर्निंग) वेब पोर्टलची लिंक 27 ऑगस्टपासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या वेब पोर्टलचे प्रकाशन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, मुक्त अध्ययन प्रशाला विभागाचे अतिरिक्त संचालक प्रा. संजीव सोनवणे आदी उपस्थित होते.

या वेब पोर्टलवर दूरशिक्षण अभ्यासक्रमाबाबत प्रवेश, मार्गदर्शन व विद्यार्थ्यांसाठी मदत, सूचना या सुविधांसाठीचे स्वतंत्र वेब पोर्टल तयार करण्यात आले आहे. त्याचा पत्ता  http://www.unipune.ac.in असा
आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.