म्हसवडमधील तरुणाने दिला प्रामाणिकपणाचा धडा

म्हसवड – वडूज येथे कामानिमित्त आलेल्या म्हसवड येथील अविनाश मासाळ या तरुणाला काम आटोपून घरी परतत असताना दोरगेवाडी घाटात एका महिलेची पर्स सापडली. या पर्समध्ये आठ हजार रुपयांची रोख रक्कम तसेच चांदीचे किरकोळ दागिने आणि काही कागदपत्र असा ऐवज होता. मात्र कसलाही लोभ नसलेल्या अविनाशने पर्समध्ये असणाऱ्या कागदपत्रांवरील पत्त्याच्या आधारे संबंधित महिलेला पर्स देऊन एकप्रकारे प्रामाणिकपणाचा धडा दिला आहे.

यलमरवाडी (पो. कातरखटाव, ता. खटाव) येथील तानाजी शिंगाडे यांचे भाऊ आपल्या पत्नी आणि मुलांना घेऊन माण तालुक्‍यातील रांजणी येथे नातेवाईकांना भेटायला गेले होते. नातेवाईकांना भेटून घरी परत जात असताना तानाजी शिंगाडे यांच्या भावाच्या पत्नीकडे असणारी पर्स दोरगेवाडीच्या घाटात पडली. मात्र पर्स पडल्याची बाब ही घरी पोहोचल्यानंतर त्यांच्या लक्षात आली.

दरम्यान, कामानिमित्त वडूला गेलेला मासाळवाडी येथील तरुण अविनाश मासाळ हा घरी परतत असताना दोरगेवाडीच्या घाटात त्याला ही पर्स सापडली. पर्सची पाहणी केला असता त्यामध्ये रोख आठ हजार रुपये, चांदीचे किरकोळ दागिने आणि तानाजी शिंगाडे यांचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड त्यामध्ये सापडले. त्यानंतर अविनाशने थेटे अनिल देसाई यांना फोन करुन शिंगाडे यांच्याविषयी माहिती घेऊन त्यांचा मोबाईल नंबर घेतला आणि शिंगाडे यांना फोन करुन पर्सविषयी माहिती दिली. त्यानंतर तानाजी शिंगाडे हे मासाळवाडी येथे अविनाशच्या घरी पोहोचले. त्यानंतर खातरजमा करुन अविनाशने सापडलेली पर्स रोख रक्कम आणि दागिन्यांसह त्यांच्याकडे सुपुर्त केली. अविनाशने दाखविलेल्या या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)