कराड ( प्रतिनिधी) – काले- संजयनगर (ता. कराड) येथील नाईकबाचा माळ नावाच्या शिवारात संतोष पाटील यांच्या घरात मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास बिबट्याने प्रवेश केला. बिबट्याने त्यांच्या सोप्याकडे अचानक धाव घेतली.
यावेळी कुत्र्यांनी जोरजोरात भुंकून बिबट्याला घरातून हुसकावून लावल्याने मोठा नार्थ टळला. मात्र बिबट्याने अचानक घरात प्रवेश केल्याने पाटील कुटुंबीयांत भीती असून परिसरात खळबळ उडाली आहे.
हल्ले थांबेनात; दुचाकीस्वारावर बिबट्याने घातली झडप अन्…
काले- संजयनगर येथील संतोष पाटील नाईकबा माळावार वास्तव्यास आहेत. या परिसरात त्यांचे एकमेव घर आहे. अशातच मंगळवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास बिबट्याने पाटील यांच्या घरात प्रवेश करत सोप्यावर धाव घेतली. मात्र यावेळी कुत्र्यांच्या जोरजोराच्या भुंकण्याने बिबट्याने तेथून पळ काढला.
यावेळी पाटील कुटुंबीयांनी खिडकीतून बाहेर पाहिले असता त्यांना बिबट्या दिसला. त्यानंतर पाटील कुटुंबीयांनी सीसीटीव्ही तपासले असता बिबट्या घराच्या पायर्या चढून येताना दिसला. त्याला पाहताच कुत्र्यांनी भुंकण्यास सुरूवात केली. बिबट्याच्या येण्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण आहे.