वाहनाचा शिकाऊ परवाना घरबसल्या मिळणार

  • पुढील दोन दिवसांत होणार पिंपरी-चिंचवड शहरात अंमलबजावणी

पिंपरी – आरटीओ कार्यालयात न जाता आता नागरिकांना घरबसल्या शिकाऊ परवाना मिळणार आहे. परिवहन विभागाने राष्ट्रीय माहिती केंद्राचय (एनआयसी) वाहनांशी संबंधित सॉफ्टवेअरमध्ये दुरुस्ती केली असून ही सेवा 1 एप्रिलपासून राज्यात सुरू झाली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातदेखील ही सुविधा येत्या दोन दिवसांत सुरू होणार असल्याची माहिती, उपप्रादेशिक परिवहन आधिकारी अतुल वादे यांनी दिली.

महाराष्ट्रात 16 प्रादेशिक आणि 34 उपप्रादेशीक परिवहन कार्यालये आहेत. या कार्यालयांवर सातत्याने दलाल संस्कृती पोसली जात असल्याचा आरोप होतो. त्यातच सध्या करोनाच्या संकटामुळे वाहन परवाना देण्यासाठी व कार्यालयातील उपस्थितीवर अनेक बंधने आली आहेत. या पार्श्‍वभूमीवर राज्याच्या परिवहन विभागाने आपल्या संगणक प्रणालीमध्ये अमुलाग्र बदल करून ऑनलाईन पद्धतीने वाहनाचा शिकाऊ परवाना देण्याचा निर्णय घेतला आहे.

यापूर्वीप्रमाणे आता कार्यालयात येऊन परीक्षा देण्याचीही गरज भासणार नाही. याचा शुभारंभ राज्यभरात 1 एप्रिल रोजी करण्यात आला. 1 एप्रिलनंतर सलग तीन सुट्या आल्याने पिंपरी-चिंचवड उपप्रादेशक परिवहन कार्यालयातील या योजनेचा शुभारंभ दोन दिवस पुढे ढकलला गेला आहे.

उद्या सोमवार (दि. 5) किंवा परवा मंगळवारी (दि. 6) रोजी या योजनेचा पिंपरी-चिंचवड कार्यालयात शुभारंभ होईल, असा विश्‍वस उपप्रादेशिक परिवहन अधकारी अतुल वादे यांनी व्यक्त केला. ही योजना सुरू झाल्यानंतर शिकाऊ वाहन परवाना घेणाऱ्यास परिवहन कार्यालयात येण्याची आवश्‍यकता नसून घरसबसल्या उमेदवाराला आरटीओच्या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करून परीक्षेसाठी विशिष्ट तारीख घ्यावी लागेल. आधार कार्ड व इतरही माहिती अपलोड करून शुल्क भरावे लागेल.

यानंतर निश्‍चित केलेल्या तारखेला घरून ऑनलाईन परीक्षा देता येईल. त्यामध्ये उत्तीर्ण होणाऱ्यांना घरबसल्या वाहन चालवण्याचा शिकाऊ परवाना मिळणार आहे. सध्या आरटीओ कार्यालयात एकाच वेळी परीक्षा घेतली जाते. मात्र, या सुविधेमुळे वाहन परवाना काढणे आणखी सुलभ होणार आहे. ज्यांच्याकडे घरून परीक्षा देण्याची सुविधा नाही, त्यांना राज्यभरातील आरटीओ कार्यालयात पूर्वीप्रमाणे परीक्षा देता येणार आहे.

लघु चित्रफितीद्वारे जनजागृती
नवीन पद्धितीनुसार, सलग दोन दिवस प्रत्येकी 30 गुणांची ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार असून परीक्षा देतांना उमेदवारांच्या संकणक, लॅपटॉपवर रस्ते सुरक्षिततेबाबत नियमांची लघु चित्रफित व विविध नियम दृश्‍य स्वरूपात दाखविले जाणार आहे. याद्वारे परिवहन विभागाकडून वाहनचालकांमधये जनजागृती केली जाणार आहे.

करोनाच्या संकटामुळे परिवहन कार्यालयातील संगणक प्रणालीमध्ये अनेक बदल केले जात आहेत. वाहन चालविण्याचा घरबसलया परवाना देणे हा त्याचाच एक भाग असून या सुविधेमुळे नागरिकांचा फायदा होणार असून आरटीओ कार्यालयातील गर्दीही टाळता येणार आहे. तसेच नागरिकांना आरटीओ कार्यालयात शिकाऊ परवाण्यासाठी वेळ वाया घालावा लागणार नाही.
अतूल आदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी-चिंचवड

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.