-->

पुणे मेट्रोची झेप आता सासवडपर्यंत

हडपसरपासूनचा मार्ग सर्वेक्षणाच्या अंतिम टप्प्यात


शिवाजीनगरहून येणारी मेट्रो गाडीतळमार्गे धावणार

पुणे – “पीएमआरडीए’कडून हडपसर येथील गाडीतळ ते सासवड असा मेट्रो मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. या मार्गाचे सर्व्हेक्षणाचे काम दिल्ली मेट्रोकडून अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे शिवाजीनगर येथील येणारा मेट्रोचा एक मार्ग लोणीकाळभोरला तर दुसरा मार्ग गाडीतळ येथून सासवड रेल्वे स्टेशनपर्यंत जाणार आहे.

पीएमआरडीएने हिंजवडी ते शिवाजीनगर असा मेट्रो प्रकल्प हाती घेतला आहे. दरम्यान शिवाजीनगरपासून ही मेट्रो हडपसर येथे नेण्याची मागणी होत होती. त्यामुळे हिंजवडी -शिवाजीनगर- हडपसर -फुरसुंगीपर्यंत असा मेट्रो मार्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु मध्यंतरी पालकमंत्री अजित पवार यांनी “शिवाजीनगर ते फुरसुंगीपर्यंत दर्शवलेला मेट्रो मार्ग लोणीकाळभोरपर्यंत वाढवावा. दिल्ली मेट्रोने फुरसुंगीपर्यंतच्या सादर केलेल्या अहवाल सुधारित करून तो तातडीने सादर करावा,’ अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या होत्या.

त्यानुसार दिल्ली मेट्रोकडून या मार्गांचे सर्व्हेक्षणाचे काम गतीने सुरू करण्यात आले आहे. तसेच पुरंदर तालुक्‍यात विमानतळ प्रस्तावित आहेत. त्यामुळे या ठिकाणावरून पुणे शहरात लवकर पोहोचणे शक्‍य होणार आहे. शिवाजीनगर ते फुरसुंगीदरम्यानच्या 16 किलोमीटर लांबीचा हा मार्ग दर्शविण्यात आला आहे. 

परंतु, तो पुन्हा लोणीकाळभोरपर्यंत पुढे नेण्याचा निर्णय घेण्यात आला. या संपूर्ण मार्गावरून 57 मेट्रोच्या कार धावण्याचे नियोजन असेल. तर गाडीतळ ते सासवडदरम्यानचा मेट्रो मार्ग हा 25 किलोमीटर लांबीचा मार्ग असणार आहे. हा मार्ग देखील संपूर्ण इलेव्हेटेड मार्ग असणार आहे, असे पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.