नगर जिल्ह्यात नेते अजूनही कुंपणावर

कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी झाली असली, तरी जागावाटप अद्यापही जाहीर झालेले नाही. अर्थात युतीच्या यादीची प्रतीक्षा असल्याने आघाडीकडून जागावाटप व उमेदवार जाहीर करण्यास उशीर होत आहे. जिल्ह्यात आघाडीत राष्ट्रवादी 12 पैकी 9 मतदारसंघ लढणार असल्याचा दावा करीत आहे; परंतु प्रत्यक्षात कर्जत-जामखेड व पारनेर हे दोन मतदारसंघ वगळता अन्य मतदारसंघात उमेदवार कोण असा प्रश्‍न पडतो. उर्वरित सात मतदारसंघांत राष्ट्रवादीला उमेदवारांची वानवाच दिसून येत असून उमेदवारांचा शोध घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. ज्या मतदारसंघात उमेदवार आहे, ते अद्यापही उमेदवारी जाहीर करण्याच्या मानसिकतेत नाही. ते अजूनही कुंपणावर असल्याने राष्ट्रवादीची अवस्था असून अडचण नसून खोळंबा अशी झाली आहे.

नगर जिल्ह्यात भाजप व शिवसेनेचे वाढते प्रस्थ पाहता आघाडीच्या अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. एकेकाळी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नगर जिल्ह्यात आज दोन्ही कॉंग्रेसला बारा जागांवर उमेदवार देण्याबाबत प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे. त्यात संगमनेर, श्रीरामपूर, शिर्डी हे तीन मतदारासंघ कॉंग्रेसच्या वाट्याला जाण्याची शक्‍यता आहे. उर्वरित 9 मतदारासंघ राष्ट्रवादी लढणार असल्याचे सांगण्यात आले आहे. पण या मतदारसंघ उमेदवार कोण असेल, हे मात्र अद्यापही स्पष्ट झालेले नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली तरी राष्ट्रवादीचे बहुसंख्य नेते अजूनही शिवसेना व भाजपमध्ये प्रवेश करण्यास इच्छुक असून आघाडीची उमेदवारी न करण्याच्या मानसिकतेत आहे. पर्याय मिळाला नाही तर आघाडीच्या उमेदवारीचा विचार करण्यात येण्याची सध्या तरी स्थिती आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडे सध्या तरी उमेदवारांचा वानवाच दिसून येत आहे.

कर्जत- जामखेडमधून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार व पारनेरमधून निलेश लंके या दोघांनी लोकसभा निवडणुकीपूर्वीपासून मतदारसंघात तयारी सुरू केली आहे. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघात हे दोन उमेदवार निश्‍चित मानले जात आहे.

मात्र उर्वरित शेवगाव-पाथर्डी, श्रीगोंदा, नगर शहर, कोपरगाव, अकोले, राहुरी, नेवासे या सात मतदारसंघांत उमेदवारांची कोणीतही चर्चा होत नसल्याचे दिसत आहे. शेवगाव-पाथर्डीमध्ये माजी आमदार चंद्रशेखर घुले, केदारश्‍वर कारखान्याचे अध्यक्ष ऍड. प्रतापराव ढाकणे यांच्या नावाची चर्चा आहे. त्यात घुले यांनी अद्यापही आपली भूमिका स्पष्ट केली नाही. ते मतदारसंघात फिरतदेखील नाही. तर ऍड. ढाकणे यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. पण त्यांनी आपले चिन्हे अद्यापही जाहीर केले नाही.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)