आघाडीची बैठक संपली; लवकरच सरकार स्थापन करणार

नवी दिल्ली : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर दिल्ली हे राज्यातील सत्तेचं केंद्र बनले आहे. त्या अनुषंगाने अनेक महत्वाच्या घडामोडी दिल्लीत घडत असल्याचे पाहायला मिळत आहे. आज काँग्रेस नेते अहमद पटेल आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील दोन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठकपार पडली. या बैठकीत सरकार स्थापनेबाबत सकारात्मक निर्णय झाल्याची माहिती काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.

आज आणि उद्या आणखी चर्चा होईल, आणि त्यानंतर सविस्तर माहिती लोकांना दिली जाईल असंही त्यांनी  यावेळी सांगितले. चव्हाण पुढे म्हणले की, त्यावेळी ते म्हणाले गेल्या २१ दिवसांपासून राज्यात राष्ट्रपती राजवट सुरु आहे. ती राजवट संपविण्यासाठी दिर्घवेळ चर्चा झाली. सकारात्मक चर्चा करण्यात आली. लवकरात लवकर महाराष्ट्रात स्थिर सरकार अस्तित्वात येईल. पुढील २-३ दिवसात चित्र स्पष्ट होणार आहे.

आणखी काही गोष्टींवर चर्चा व्हायची बाकी आहे. ती लवकरच पूर्ण होईल असंही त्यांनी सांगितले. तीन पक्ष एकत्र आल्याशिवाय सरकार स्थापन होणार नाही. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येत पर्यायी सरकार देईल अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली. दरम्यान या बैठकीत किमान समान कार्यक्रमावर एकमत झाल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.