माजी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांना आज अखेरचा निरोप

नवी दिल्ली: माजी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांचे शनिवारी दुपारी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात निधन झाले. आज त्यांच्यावर निगम बोध घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दरम्यान, आज भाजपच्या मुख्यालयात अरुण जेटली यांचे पार्थिव अत्यंदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. दुपारी 2 च्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

शनिवारी जेटली यांचे पार्थिव एम्स रुग्णालयातून कैलाश कॉलनी येथील त्यांच्या निवासस्थानी हलवण्यात आले होते. यावेळी अनेक राजकीय नेत्यांनी जेटलींचे अंत्यदर्शन घेतले. आज सकाळी दहा वाजता जेटलींचे पार्थिव भाजप मुख्यालयात आणले गेले. याठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांना आणि सामान्य लोकांना त्यांचे अंत्यदर्शन घेता येईल. यानंतर निगम बोध घाटापर्यंत त्यांची अंत्ययात्रा काढण्यात येईल. दुपारी साधारण दोनच्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील. भाजपमधील संयमी आणि बुद्धिमान नेता, उत्कृष्ट संसदपटू आणि सर्वपक्षीय संबंध असणारा नेता म्हणून जेटली यांची ओळख होती. दिल्लीतील उच्चभ्रू वर्तुळात जेटलींना विशेष मान होता.

Leave A Reply

Your email address will not be published.