चिंबळी -गणेशोत्सव अवघ्या 13 दिवसांवर आला आहे. यंदा करोनामुळे गणेशोत्सव साधेपणाने साजरा होणार असून चार फुटांपेक्षा मोठ्या श्रींच्या मूर्ती यावेळी दिसणार नाही. तर छोट्या मूर्ती तयार असून मरकळ, कुरूळी (ता. खेड) येथील कुंभारवाड्यात मुर्तीकार मूर्तींवर शेवटचा हात फिरवत आहेत.
यावर्षी गणेशमूर्तींना मागणी कमी असल्याने व मूर्ती बनवण्याचे साहित्य उशीरा मिळाल्याने मूर्तीकार अद्यापही मूर्तींवर रंगाचा शेवटचा हात फिरवण्यात मग्न आहेत. तर अनेक मूर्ती विक्रीसाठी तयार ठेवण्यात आल्या आहेत.