कराड येथील भूमापक लाच लुचपतच्या जाळ्यात

कराड – तक्रारदार यांचे भूखंड एकत्रीकरण करण्याचे काम करून देण्यासाठी 13 हजार रुपयांची लाच घेताना परिक्षण भूमापकास रंगेहात पकडले. कराडच्या उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात लाचलुचपत विभाग पथकाने आज सकाळी ही कारवाई केली. आनंदराव विठ्ठल माने (वय 35) मूळ रा. नढवळ, ता. खटाव असे लाच स्वीकारणाऱ्या भूममापकाचे नाव आहे.

सोमवार पेठेतील तक्रारदाराचे भूखंड एकत्रीकरणाचे काम करायचे होते. हे एकत्रित करण्याचे काम करून देण्यासाठी आनंदराव माने याने तक्रारदाराकडे सुमारे 15 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदार व माने यांच्या तडजोडीअंती 13 हजार रुपये लाच देण्याचे तक्रारदाराने कबूल केले. व लाचलुचपत विभागाला याबाबतची माहिती दिली. त्यावरून लाचलुचपत विभागाने भूमी अभिलेख कार्यालयात सापळा रचला. त्यावेळी 13 हजार रुपयांची लाच स्वीकारताना माने याला रंगेहात पकडण्यात आले. या कारवाईत पोलीस उपअधीक्षक अशोक शिर्के व हवालदार साळुंखे, पोलीस नाईक राजे, शिपाई काटकर, भोसले यांनी सहभाग घेतला. पुढील तपास पोलीस उपअधिक्षक अशोक शिर्के करीत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.