सातारा – सातारा जिल्ह्यात सलग मुसळधार पाऊस पडत असल्याने सर्वत्र पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शहर आणि परिसरात होत असलेल्या पावसाने सर्वांचीच त्रेधा उडाली आहे. सोबतचे छायाचित्र पाहिल्यानंतर हा एखादा तलाव किंवा ओढ्याचे पाणी असल्याचे वाटत आहे.
मात्र थांबा हा तलाव किंवा ओढा नसून राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 वर खिंडवाडी ते शेंद्रे दरम्यान महामार्गावर वाहत असलेले पावसाचे पाणी आहे. गेल्या 5 ते 6 सहा दिवसात याठिकाणी पाण्याचा अंदाज न आल्याने अपघातांची संख्याही वाढली आहे.