शिरूर/शिक्रापूर – बेळगाव येथील मनगुत्ती गावातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्याच्या निषेधार्थ संतप्त शिवसैनिकांनी कोरेगाव भीमा येथे कर्नाटक सरकारचा पुतळा जाळून निषेध केला.
शिवसेना उपनेते तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर कटके यांच्या नेतृत्त्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी सल्लागार अनिल काशीद, रोहिदास शिवले यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. तर मांडवगण फराटा येथे पुणे उपजिल्हाप्रमुख पोपट शेलार, शिरूर तालुकाप्रमुख सुधीर फराटे व सर्व शिवसैनिक यांच्या उपस्थितीत मांडवगण फराटा येथे पोलीस दूरक्षेत्राला निवेदन देण्यात आले.