पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हत्या करणाऱ्याला अटक

लखनौ  – वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीतच एका व्यक्‍तीची हत्या करणाऱ्या आरोपीला उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष टास्क फोर्सने लखनौमधून अटक केली आहे.

धीरेंद्र सिंह असे या आरोपीचे नाव आहे. त्याच्या व्यतिरिक्‍त अन्य दोघाजणांनाही आज सकाळी बालिया येथून अटक करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी एकूण सात जणंना अटक केली आहे. या प्रकरणी 20-25 अज्ञात आरोपी आहेत.

धीरेंद्र सिंह याने 46 वर्षीय व्यक्तीची हत्या केल्याचा त्याच्यावर अरोप आहे. वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस अधिकारी उपस्थित असलेल्या एका बैठकीमध्येच त्याने ही हत्या केल्याचा आरोप आहे. धीरेंद्र सिंहवर कठोर राष्ट्रीय सुरक्षा कायदा आणि गॅंगस्टर कायद्याखाली गुन्हा दाखल केला जाईल, असे उत्तर प्रदेश पोलिसंनी म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.