पत्नीला मेसेज करतो म्हणून केला खून

स्केटिंग खेळाडू, प्रशिक्षक खून प्रकरण : आरोपी 24 तासांत गजाआड


हिंजवडी पोलिसांची कामगिरी : मुुंबईतून पकडले आरोपीला

पिंपरी – राष्ट्रीय खेळाडू आणि स्केटिंग प्रशिक्षक निलेश नाईक याचा खून करणाऱ्या आरोपीला हिंजवडी पोलिसांनी 24 तासाच्या आत अटक केली आहे. विठ्ठल ज्ञानोबा मानमोडे रा. विघ्नहर्ता बिल्डींग, सुसगाव असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. निलेश हे आरोपीच्या पत्नीला मोबाइलवरुन मॅसेज करत होते, या रागातून विठ्ठलने निलेश यांचा खून केला.

मारुंजी येथील कोलते पाटील डेव्हलपर्स यांच्या बांधकाम साईटच्या पाठीमागील मोकळ्या जागमध्ये निलेश शिवाजी जाधव याचा धारदार हत्याराने मानेवर, गळ्यावर, व डोक्‍यात वार करुन खून केल्याची घटना 4 डिसेंबर रोजी उघडकीस आली होती. या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

खूनाचा तपास करताना निलेश हे दि. 3 डिसेंबर रोजी रात्री विठ्ठल मानमोडे यांच्यासोबत असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरुन पोलीस विठ्ठल मानमोडे याचा शोध घेतला असता तोही घरातून पसार झाल्याचे समजले. त्यामुळे, पोलिसांचा विठ्ठल मानमोडे याच्यावर संशय बळावला होता. दरम्यान विठ्ठल हा नवी मुंबई येथील हायवे रोड लगतच्या हॉटेलमध्ये लपल्याची माहीती पोलिसांना मिळाली. त्यावेळी तातडीने पोलीसांनी नवी मुंबई येथे धाव घेवून त्याला ताब्यात घेतले.

त्याच्याकडे खूनाबाबत सखोल चौकशी केल्यानंतर त्याने निलेश याचा खून केल्याची कबुली दिली. निलेश हा आपल्या पत्नीला मॅसेज करीत असल्यामुळे चिडून त्याला दारु पाजून खून केल्याचे विठ्ठल याने पोलिसांना सांगितले. मानमोडे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर चतुश्रृंगी आणि देहूरोड येथे प्रत्येकी एक असे एकूण दोन गुन्हे दाखल आहेत. पोलसांनी अटक केली असून या प्रकरणाचा अधिक तपास सहा. पोलीस निरीक्षक उध्दव खाडे करीत आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)