रक्तगट जुळत नसूनही मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया

सातारा – मुंबई सेंट्रल येथील वोक्‍हार्ड हॉस्पिटलमधील नेफ्रोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. चंदन चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पथकाने 60 वर्षे वयाच्या रुग्णावर दात्याचा रक्तगट वेगळा असूनही वृक्कीय (रेनल) मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केली. पेअर्ड एक्‍स्चेंज किडनी डोनेशन (असंगत म्हणजेच मूत्रपिंड न जुळणारे दाते असलेले रुग्ण जुळणाऱ्या मूत्रिपंड दात्यांशी अवयवदानाची अदलाबदल करतात) जगभरात वाढत असले, तरीही भारताने अद्याप या प्रकाराचा अपेक्षित वापर क्षमतेच्या तुलनेत केलेला नाही.

60 वर्षांचे नटवर (नाव बदलले आहे) मूत्रपिंडांच्या तक्रारींमुळे मुंबई सेंट्रल येथील वोक्‍हार्ड हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी आले. नटवर यांचे कुटुंबीय काहीशा गोंधळलेल्या मन:स्थितीत होते, कारण, श्री. नटवर यांच्या पत्नीचा रक्तगट त्यांच्याशी जुळत नव्हता आणि त्यांच्यासाठी त्याच अवयवदात्या होत्या. पत्नीचा रक्तगट एबी पॉझिटिव्ह तर रुग्णाचा रक्तगट ए पॉझिटिव्ह होता. डॉ. चंदन आणि त्यांच्या पथकाने शस्त्रक्रियापूर्व मूल्यांकन करून रुग्णाला प्रत्यारोपणासाठी तयार केले. यामध्ये कोणतीही गुंतागुंत होऊ नये म्हणून कोरोनरी अँजिओग्राफीही करण्यात आली. मूत्रपिंडदात्याच्या तंदुरुस्तीचे परीक्षण करण्यात आले तसेच त्यांच्या अन्य चाचण्याही करण्यात आल्या.मूत्रपिंड प्रत्यारोपण फेब्रुवारी 2019 मध्ये करण्यात आले.

रुग्ण शस्त्रक्रियेनंतर वेगाने बरा झाला आणि शस्त्रक्रियेदरम्यानही कोणतीही गुंतागुंत न होता सर्व काही सुरळीत पार पडले.डॉ. चंदन चौधरी म्हणाले, जिवंत मूत्रपिंड दाता ग्राहकाला (रुग्णाला) अनुकूल नसेल तर अशा परिस्थिती पेअर्ड किडनी ट्रान्सप्लांट (याला स्वॅप ट्रान्सप्लाण्ट असेही म्हणतात) केले जाते आणि मग अन्य दाता/ग्राहकाच्या आणखी एका जोडीसोबत मूत्रपिंडाचे हस्तांतर केले जाते. पण ज्याच्यावर प्रत्यारोपण करायचे त्याचा रक्तगट ओ पॉझिटिव्ह असेल तर या तंत्राचा अवलंब केला जात नाही. दाता व ग्राहकाचा रक्तगट वेगळा असताना शस्त्रक्रिया होणे फारसे अपवादात्मक नाही पण भारतात मात्र काही ठिकाणीच अशा पद्धतीने शस्त्रक्रिया केली जाते. डायलिसिसवर असलेल्या रुग्णाचे आयुष्य 5 वर्षांनी वाढते तर प्रत्यारोपणामुळे डायलिसिसच्या तुलनेत अनेक वर्षे आयुष्य वाढते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.