‘चाची ४२०’मधली बालकलाकार आता दिसते अशी

मुंबई –  चाची 420 चित्रपटाची सिनेप्रेक्षकांना चांगलाच लक्षात आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हसन आणि तब्बू यांची मुख्य भूमिका असलेला या चित्रपटामध्ये भारती रतन या चिमुकलीचा किरदार आजही लोकांचा मनात घर करून जाते. ही चिमुकली कोणी दुसरी नसून फातिमा सना शेख आहे.

 

View this post on Instagram

 

#Throwback #chachi420 @tabutiful

A post shared by Fatima Sana Shaikh (@fatimasanashaikh) on


‘चाची ४२० ‘ हा चित्रपट त्या काळी प्रचंड लोकप्रिय झाला होता. या चित्रपटात तब्बू आणि कमल हसनसोबत फातिमाचीही महत्वाची भूमिका होती. यामध्ये फातिमाने भारती रतन या बालकलाकाराची भूमिका वठविली होती. काही दिवसांपूर्वी  फातिमाने ‘चाची ४२०’ मधला एक फोटो शेअर केला होता. तिच्या या फोटोमुळे फातिमानेच भारती रतनची भूमिका साकारली होती, हे स्पष्ट झालं होतं.

 

View this post on Instagram

 

Bhaiya ?? Shaanib

A post shared by Fatima Sana Shaikh (@fatimasanashaikh) on


दरम्यान, काही दिवसांपूर्वी  फातिमा सना शेखने आपल्या इंस्टाग्राम अकांउटवर एक फोटो शेअर केला होता. त्यावरून तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता मात्र  या अभिनेत्रीने असे प्रत्युत्तर दिले की तिचे चाहतेही खुष झाले. सनाने आपल्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. ज्यात तिच्या हातात कप दिसत आहे आणि तिच्यासमोर जेवनाची एक प्लेट दिसते. हा फोटो शेअर करत तिने लिहिले की, “पिकनिक, हे माझे जेवन नाही.’

 

View this post on Instagram

 

??? @chabeiteacup

A post shared by Fatima Sana Shaikh (@fatimasanashaikh) on


फातिमाने हे जेवन तिचे नसल्याचे स्पष्ट केले असतानाही काही ट्रोल्सनी तिच्यावर निशाणा साधला. “हा रमजानचा महिना असल्याने अशी पोस्ट करु नको, अन्य मुस्लिम बांधवांचे रोजे आहेत. त्याचा सन्मान कर.’ ही पोस्ट वाचल्यावर फातिमाने त्या ट्रोलला सडेतोड उत्तर दिले. तिने प्रथम ट्रोलरला टॅग केले आणि त्यानंतर त्याला कधीही ऑनलाईन न येण्याचा इशारा दिला. तुला जर फोटोचा ऐवढा त्रास होत असेल, तर तु सोशल मीडियावर येण्याचे बंद कर, असे उत्तर दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.