कर्नाटक सरकारला हादऱ्यांमागून हादरे 

कॉंग्रेसच्या आणखी दोन आमदारांचा राजीनामा 
बंगळूर – अस्थिरतेच्या खाईत लोटल्या गेलेल्या कर्नाटकमधील कॉंग्रेस-जेडीएस आघाडी सरकारला हादऱ्यांमागून हादरे बसतच आहेत. त्या राज्यातील सत्तारूढ कॉंग्रेसच्या आणखी दोन आमदारांनी बुधवारी राजीनामा दिला. त्यामुळे राजीनामा देणाऱ्या आमदारांची संख्या 16 वर पोहचली आहे.

ताज्या घडामोडीत राजीनामा देणाऱ्या आमदारांमध्ये कर्नाटकचे मंत्री एम.टी.बी.नागराज यांचाही समावेश आहे. नागराज आणि के.सुधाकर यांनी विधानसभेच्या सभापतींकडे राजीनामा सादर केला. त्यामुळे राजीनामा देणाऱ्या कॉंग्रेस आमदारांची संख्या 13 इतकी झाली आहे. त्याशिवाय, जेडीएसच्या 3 आमदारांनीही याआधीच राजीनामा दिला आहे. आमदारांचे राजीनामे स्वीकारले गेल्यास कर्नाटक सरकार अल्पमतात येणार आहे. कर्नाटक विधानसभेचे एकूण संख्याबळ 224 आहे. सत्तारूढ आघाडीचे 116 आमदार आहेत. बहुमताचा आकडा गाठण्यासाठी 113 इतके संख्याबळ आवश्‍यक आहे. प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या भाजपचे 107 आमदार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.