कर्नाटक प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु

नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानंतर काल कर्नाटकातील जेडीएस-काँग्रेस आघाडीच्या बंडखोर आमदारांनी बंगळुरू येथील विधान सौध भवनात कर्नाटकचे विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांची भेट घेतली होती. मात्र विधानसभा अध्यक्षांसोबत झालेल्या बैठकीनंतरही काहीच तोडगा न निघाल्याने आज सर्वोच्च न्यायालय याप्रकरणी निर्णय देण्याची शक्यता आहे.

दरम्यान, आज सर्वोच्च न्यायालयामध्ये बंडखोर आमदारांतर्फे मुकुल रोहतगी हे तर काँग्रेसतर्फे अभिषेक मनू संघवी हे बाजू मांडत आहेत. सदर प्रकरणी आमदारांची बाजू मांडताना विधिज्ञ मुकुल रोहतगी यांनी विधानसभा अध्यक्ष हे काही अपवाद वगळता सर्वोच्च न्यायालयाला उत्तर देण्यास बंधनकारक असल्याचे सांगितले. तर काँग्रेसतर्फे बाजू मांडताना काँग्रेस नेते व जेष्ठ विधिज्ञ अभिषेक मनू संघवी यांनी आमदारांचा राजीनामे सादर करण्यामागचा हेतू हा वेगळाच असून आमदारांना राजीनामा देऊन अपात्र ठरण्यापासून वाचायचे आहे असा दावा केला. कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांची बाजू मांडताना विधिज्ञ डॉक्टर राजीव धवन यांनी, आमदारांनी विधानसभा अध्यक्षांवर लावलेल्या पक्षपातीपणाच्या आरोपांवर आक्षेप नोंदवला.

Leave A Reply

Your email address will not be published.