वारीत सहभागी होण्याचा आनंद सर्वांत अनोखा; वयाच्या 85 व्या वर्षांतही वारी

पुणे – लहानपणी वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत केलेली पंढरीची वारी, आज वयाच्या 85 व्या वर्षीदेखील अखंड सुरू आहे. रघुनाथ साठे हे वयाच्या पाचव्या वर्षापासून वारीत सहभागी होत आहेत. आजही तितक्‍याच उत्साहाने वीणा वाजवत, पांडुरंगाचे भजन गात, नृत्य करत रघुनाथ यांचा प्रवास सुरू आहे.

साठे हे मूळचे नाशिक येथील, मात्र कामानिमित्त ते ठाण्यात राहतात. रघुनाथ यांचे वडीलदेखील वारीत सहभागी होत असत. “वडिलांमुळेच मलाही लहानपणापासूनच वारीत सहभागी होण्याची उत्सूकता होती. वारीतच मी वीणा वाजवायला शिकलो. विठ्ठलभक्‍तीत तल्लीन होत, शेकडो किलोमीटर चालणारे वारकरी पाहून नेहमीच आनंद मिळतो. समाधान अनुभवण्यासाठी मी नेहमी वारीत येतो. मी एका कंपनीत काम करत होतो. त्यावेळी मी वर्षभर कधीही सुट्टी घेतली नव्हती, मात्र वारीसाठी आवर्जून महिन्याची सुट्टी घेत असे. वारीसाठी जातोय म्हटल्यावर कंपनीनेदेखील अडवणूक केली नाही. वारकरी म्हणून अनेकांकडून सन्मानाची वागणूक मिळते. माऊलींच्या, विठुरायांच्या दर्शनाचे, पंढरीच्या वारीत सहभागी होण्याचा आनंद हा अनोखा आहे. ही ओढ मनात कायमच असते,’ असेही साठे म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.