पुणेः काल मंकरसंक्रातीचा सण असल्याने अनेकांकडून पंतगबाजी करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून पोलिसांनी शहरात नॅायलॅान माजांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई देखील केली. तरी देखील शहरातील अनेक भागात पंतगबाजी करताना सर्रास नायलॅान मांजाच्या साह्याने पतंगबाजी करण्यात आली. यामुळे मांजामध्ये अनेक पक्षी अडकून जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
तसेच नॅायलॅान मांजामुळे एका जेष्ठाच्या गळ्याला देखील फास बसल्याने त्यांना दुखापत झाल्याची देखील घटना घडली आहे. मंगळवारी दि. १४ जानेवारी रोजी शहरात वीसहून अधिक पक्षी मांज्यामध्ये अडकून जखमी झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यामुळे ज्या पक्षांना इजा झाली त्यांची नोंद नसल्याच्या कित्येक घटना असू शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
यामुळे तुमच्या पतंगबाजीचा आनंद, पक्षांना मात्र त्रास का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पुणे पोलिसांनी विशेष मोहिम राबवित शहरातील अनेक भागात छापा मारत अवैधरित्या मांजाची विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली. तरी देखील अनेकांकडून पतंगबाजी करताना मांजाचा वापर करण्यात आला. यामुळे पक्ष्यांसह, दुचाकीस्वारांना देखील याचा नाहक त्रास सहन करावा लागला.
मूळात, गेल्या काही दिवसांपासून पोलिसांनी नायलॅान मांजाची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करीत नायलॅान मांजा जप्त देखील केला. मात्र, तरी देखील अनेकांनी पतंगबाजी करताना मांजाचा वापर केला असल्याचे दिसते. यामुळे आता अशा लोकांवर कारवाई करणे गरजेचे असल्याचे तसेच यासाठी यासाठी पथक नेमणे गरजेचे असल्याचे सांगण्यात येत आहे.
रेस्क्यू टीमकडे अनेक तक्रारी
रेस्कू चॅरिटेबल ट्रस्टकडून शहरात मांजामध्ये अकडलेल्या पक्षांची सुटका करण्यात आल्याची माहिती मिळत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या ट्रस्टकडून पक्षांच्या सर्वेक्षार्थ ही मोहिम राबविण्यात येते. काल मंगळवारी दिवसभरात १० पेक्षा अधिक तक्रारी रेस्क्यू ट्रस्टकडे आल्या होत्या. त्यानुसार मांजामध्ये अडकलेल्या पक्ष्यांची सुटका करण्यात आली.