मार्केट यार्डातील गुळ-भुसार विभाग सुरू

पहिल्या दिवशी सुरळीत व्यवहार : बाजार समितीच्या उपाययोजनांचे चांगले परिणाम

पुणे: मार्केट यार्डातील भुसार बाजार आठवड्यानंतर सुरू झाला आहे. बाजार समितीच्या नियोजनानुसार सुरळीत सुरू झाला आहे. बाजारात प्रवेश करणाऱ्यांची प्रवेशद्वारावर थर्मल गणद्वारे तपासणी करण्यात येत आहे. सोशल डिस्टनिंगचे पालन केले जात आहे. गर्दी कमी करण्यास बाजार समिती प्रशासनाला यश आल्याचे दिसून येत आहे.

बाजारातील सुमारे 15 जणांना करोनाची लागण झाली. या पार्श्‍वभूमीवर आडते आणि कामगारांमध्ये भीतीचे वातववरण निर्माण झाले होते. त्यामुळे 19 मेपासून दि पुना मर्चंट्‌स चेंबरने बाजार बंद केला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी, बाजार समिती प्रशासन आणि चेंबरच्या प्रतिनिधिंची बैठक झाली. यामध्ये बाजार सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सोमवारपासून (दि.25) सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत व्यवहार सुरू झाला आहे.

आवक घेऊन आलेल्या मर्यादीत गाड्यांना प्रवेश देण्यात येत आहे. याविषजी बाजार समितीचे प्रशासक बी.जे.देशमुख म्हणाले, दररोज आवक घेऊन आलेल्या केवळ 100 गाड्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. आज तब्बल 234 गाड्यांची आवक झाली. त्यापैकी ठरल्याप्रमाणे पाच क्रमांकाच्या प्रवेशद्वारातून 100 वाहनांनाच प्रवेश देण्यात आला. बाजार प्रवेश करताना प्रत्येकाला मास्क घालणे बंधनकारण करण्यात आले आहे.

व्यापाऱ्यांना दुकानात सॅनिटायझर ठेवण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत. बाधित परिसरातील लोकांना बाजारात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. वाहनांची आणि खरेदीदारांची गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे बाजारात सोशल डिस्टनिंगचे पालन केले जात आहे. सायंकाळी 6 नंतर बाजारात थांबता येणार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.