शेतकऱ्यांबद्दल ‘ते’ वक्तव्य कंगनाला भोवले; सहा ब्रँण्डकडून कॉन्ट्रॅक्ट रद्द

मुंबई : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले. या रॅली दरम्यान पोलीस आणि शेतकरी आमने-सामने आले आहेत. यावेळी शेतकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या असून तणाव निर्माण झाला आहे. दिल्लीतील या हिसेंत आतापर्यंत एका शेतकऱ्याचा जीव गेले आहे. यावर अभिनेत्री आणि वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कंगना राणावत हिची प्रतिक्रिया आली आहे. मात्र या ट्विटमुळे तिचे कोटींच्या घरात नुकसान झाले आहे.

तिने याबाबत ट्विट करत सांगितले आहे की,’ “युपी पोलीस लठ्ठ बजाओ” असा हॅशटॅग कंगनाने वापरला आहे. या व्यतिरिक्त कंगनाने आपल्या मनातीत खदखद बोलून दाखवली.’ या कॅप्शन सोबत तिने व्हिडियोसुद्धा शेअर केला होता. यावर आता कंगनाचा हा व्हिडीओ पाहिल्यावर नेटकऱ्यांनी तिला चांगलंच धारेवर धरलं आणि टीकास्त्र डागलं. यामध्येच आता सहा दिग्गज ब्रँण्डने तिच्यासोबतचं कॉन्ट्रॅक्ट रद्द केलं आहे.

दरम्यान,’ मी शेतकऱ्यांना दहशतवादी म्हटले तेव्हा सहा कंपन्यांनी मला ब्रँड ऐम्बेसेडर बनविण्यास नकार दिला. आता मी म्हणते की, शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणारा प्रत्येक भारतीय नागरिक अतिरेकी आहे, असंही कंगनाने म्हटले आहे. यावेळी कंगनाने त्या सहा ब्रँडला देखील फटकारले.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.