अफगाणिस्तानच्या देशांना इस्लामिक स्टेटचा धोका

संयुक्‍त राष्ट्रे : इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेच्या आशियातील शाखेचे अस्तित्व अजूनही कायम असून इस्लामिक स्टेटच्या आशिया खंडातील म्होरक्‍यांनी तेहरीक ए तालिबान पाकिस्तानसारख्या संघटनांबरोबर संधान साधले आहे. अफगाणिस्तानच्या शेजारील देशांमध्ये घातपाती कारवायांचा धोका संयुक्‍त राष्ट्राच्या एका अहवालात व्यक्‍त करण्यात आला आहे.

संयुक्‍त राष्ट्राच्या सदस्य देशांमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षिततेला “इसिल'(इस्लामिक स्टेट इन सिरीया ऍन्ड लिबीया)कडून धोका संभवतो. इराकमधील इस्लामिक स्टेट आणि लेव्हंट-खोरासन (आयएसआयएल-के) वर अफगाणिस्तानच्या सुरक्षा दल आणि तालिबानी सेनेकडून सन 2019 च्या शेवटी मोठालष्करी दबाव निर्माण झाला.

त्यामुळे अफगाणिस्तानातील नांगरहार प्रांतातून या संघटनेची गच्छंती झाली. अफगाण अधिकाऱ्यांनी “आयएसआयएल-के’चे दहशतवादी आणि त्यांचे निकटवर्तीयांसह 1,400 हून अधिक लोकांना ताब्यात घेतले. तरी इराकमधील इस्लामिक स्टेट आणि लेव्हंट-खोरासन सक्रिय आहे. इंटरनेटच्या माध्यमातून संघटना नवीन सदस्यांचा शोध घेत असते. धार्मिक संस्थांमधून जिहादी प्रचारही करते. जमात-उ-अहरार, तेहरिक ए तालिबान पाकिस्तान आणि लष्कर ए तोयबा सारख्या अन्य दहशतवादी गटांबरोबर या संघटनेने संपर्क प्रस्थापित केला आहे.

पाकिस्तानातील सीमाभागात घातपाती कारवायाही केल्या जात आहेत.
“आयएसआयएल-के’ची स्थापना 10 जानेवारी 2015 रोजी तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी)चा माजी कमांडर, इस्लामिक स्टेट आणि त्याचा मारला गेलेला म्होरक्‍या अबू बकर अल-बगदादी यांना एकनिष्ठतेची शपथ देणाऱ्या तालिबानच्या माजी कमांडरने याची स्थापना केली होती. संयुक्‍त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने गेल्या वर्षी मे महिन्यात या संघटनेवर बंदी घातली आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.