पुणे-नगर महामार्गावरी वाघोलीतील घटना
पीडब्लूडीचे दुर्लक्ष व ठेकेदाराच्या गलथानपणामुळे अपघात
वाघोली – पुणे-नगर महामार्गावर वाघोलीत सुरु असलेल्या सहापदरीकरणाच्या कामामध्ये पत्रे लावण्यासाठी उभारलेल्या लोखंडी सांगाड्याला दुचाकीवरील एका व्यक्तीची धडक बसून लोखंडी रोड व्यक्तीच्या उजव्या खांद्याकडील बाजूला शरीरातून आरपार झाल्याची घटना कावेरी हॉटेल सामोरील बाजूस घडली. गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीस स्थानिक तरुणांनी रॉडचा काही भाग कापून त्याच अवस्थेमध्ये पुढील उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये हलविले.
सहापदरीकरणाचे काम करीत असताना सार्वजनिक बांधकाम विभाग ठेकेदाराच्या चुकांकडे दुर्लक्ष करीत आहे तर ठेकेदार कामामध्ये गलथानपणा करीत असल्याने अपघात घडत आहेत.
वाघोली येथील रस्ता रुंदीकरणासाठी नगर रोड कृती समितीच्या वतीने आंदोलन करून कोट्यवधी रुपयांचा निधी आणला आहे मात्र याच निधीतून होत असलेले काम दिरंगाई मुळे नागरिकांच्या जीवावर बेतू लागले आहे. तातडीने या रस्त्याचे काम करावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल.
– संपत गाडे, समन्वयक, नगर रोड वाहतूक कृती समिती