दुरावा निर्माण करणारे इंटरनेट…

मध्यंतरी आशाताई आणि सुदेश भोसले त्यांच्या इतर तरुण सहकलाकारांसोबत बागडोग्राहून कोलकात्याला येत होते. यावेळी एका ठिकाणी विसावा घेत असताना सगळे जण आपल्या स्मार्ट फोनवर बिझी झाले आणि आशाताई मात्र कपाळाला हात लावून सगळ्यांकडे पाहत राहिल्या. या क्षणाचं छायाचित्र कोणीतरी टिपलं. ते छायाचित्र आशाताईंनी ट्‌विटरच्या माध्यमातून शेअर केलं आणि त्यासोबत लिहिलं,’ इतके उत्तम सहप्रवासी असूनही गप्पा मारायला मात्र कुणीच नाही!

आशाताईंना आलेला हा अनुभव एरवी घराघरात, कॉलेज कट्ट्यांवर आणि जवळपास सर्वच सार्वजनिक ठिकाणी कॉमन झालेला आहे. तस पाहायला गेल्यास सोशल मीडिया आणि आजची तरुणाई या विषयावर आपल्या देशात जेवढी चर्चा झाली आहे, जेवढं बोललं, लिहिलं, वाचलं, पाहिलं आणि ऐकलं गेलं आहे. तेवढं कदाचितच दुसऱ्या कुठल्या देशात झालं असेल असं मला वाटतं नाही. कारण हल्लीची मुलं, वाचत नाहीत, खेळत नाहीत, तासनतास फक्त आणि फक्त मोबाईल आणि कंम्प्यूटरमध्ये डोळे घालून बसतात. आणि टीनएजर्समध्ये (किशोरवयीन मुले) हे प्रमाण जास्त असल्याची, तक्रार जवळपास प्रत्येक पालकाची आहे!

पूर्वी मुलं गप्पा मारण्यासाठी कट्टयावर किंवा एखाद्या चौकात जमायची; परंतु आता गप्पांसाठी उठून कुठे भाहेर जायची गरजच उरली नाही. कारण मुलांच्या हातात मोबाईल (इलेट्रॉनिक यंत्रे) आणि इंटरनेट नावाचे एक आयुध आले असुन, त्यात सोशल मीडिया नावाचे शस्र आले. आणि त्यामुळे तरुणाईच्या आवाक्‍यात संपूर्ण आकाशच आले आहे. चित्रपट,राजकारण, निवडणुका यांचेही व्यासपीठ तिथेच भरले.

अशा बदलत्या तरुणाईविषयी… तंत्रज्ञानाच्या प्रसारामुळे जगातील अब्जावधी लोकांच्या जीवनामध्ये फार वेगाने बदल घडताना आपण पाहतो आणि अनुभवतो आहोत. त्यांच्या संभाषणाच्या, गप्पा मारायच्या, संवादाच्या कल्पना पूर्णपणे वेगळ्या दिसून येत आहे. त्यामुळे सध्याच्या पिढीत आपल्या आई-वडीलांबरोबर आणि समाजातील इतर लोकांशी संवाद कमी होतं असून, दोघांमध्ये दुरावा निर्माण होत चालला आहे. अश्‍या व्यक्ती इंटरनेटला आपल्या मानसिक व बौद्धिक क्षमतांचे एक एकात्मिक व विस्तारित अंगच मानतात. अश्‍या व्यक्तींना वारंवार एका व्यसनाला सामोरे जावे लागेते, सारखा आपला मोबाईल हातात घेऊन व्हॉट्‌सऍप, मेल किंवा फेसबुक चेक करत राहणे.सध्या अशी बरीच उदाहरणे आपल्या आसपास दिसतील. आपली तरुण मुलं चॅटिंग ,गेमिंग, सोशल नेटवर्किंग आणि पोर्न साईट्‌सच्या मायाजालात अडकून व्यसनाधीन तर झाली नाहीत ना? याची सुद्धा खात्री पालकांनी करून घेणे आवश्‍यक आहे. त्यासाठी पालकांनीच एक पाऊल उचलून आपल्या मुलाशी मनमोकळा संवाद साधून एक मैत्री पूर्ण नाते निर्माण करणे आवश्‍यक आहे. म्हणजे, स्मार्ट फोनवर बिझी झालेली हि पिढी मोबाईलच्या जगातून बाहेर येऊन एका वास्तविक जीवनाचा आनंद घेतील.

दरम्यान, एका अहवालानुसार आज सुद्धा भारतात सक्रिय इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या 46 कोटी आहे. हे प्रमाण भारतातील लोकसंख्येच्या 35 टक्के एवढे आहे. यातील 74 टक्के प्रमाण हे तेरा ते वीस वयोगटातील तरुण वापरकर्त्यांचे आहे. यापैकी 25 टक्के तरुण इंटरनेटचा अतिवापर करतात आणि 2 टक्के तरुण या मायाजालात पूर्णपणे अडकून इंटरनेट व्यसनाधीन झाले आहे. मात्र, अजून तरी पाश्‍चात्य देशांच्या तुलनेत हे प्रमाण कमी आहे. पण देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी तरुणांना इतर व्यसनांप्रमाणे या मायाजालाच्या व्यसनापासून सुद्धा दूर ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी समाजातील सर्व स्तरांतून प्रयत्न अपेक्षित आहेत.

इंटरनेटचे व्यसन कसे ओळखाल?
– बराचसा वेळ व्हॉट्‌सअँप किंवा फेसबुक ऑनलाईन असणे.
– रात्रीची झोप पूर्ण न होणे, त्यास सकाळी लवकर जाग न येणे.
– काही कारणाने इंटरनेट बंद असल्यास अस्वस्थ होणे, चिडचिड करणे.
– सारखे मोबाईल चेक करणे.
– बंद खोलीत एकटे बसणे.
– कुटुंबीयांशी संवाद कमी होणे.
– मित्र मैत्रिणींपासून दूर राहणे.
– अभ्यासात मागे पडणे.
– आधी असलेल्या छंद, आवडीमध्ये स्वारस्य न उरणे.

– ऋषिकेश जंगम

Leave A Reply

Your email address will not be published.