युनियन बॅंकेकडून व्याजदरात कपात

प्रातिनिधिक फोटो

कोटक महिंद्रा, पीएनबीकडूनही कपात जाहीर

मुंबई -सार्वजनिक क्षेत्रातील युनियन बॅंकेने आपल्या विविध कर्जावरील व्याजदरात 0.10 टक्‍क्‍यांपर्यंत कपात केली आहे. बॅंकेचा कर्जावरील व्याजदर ठरविणारा एमसीएलआर हा यापूर्वी 8.70 टक्के होता तो आता 8.60 टक्के करण्यात आलेला आहे. गुरुवारी खासगी क्षेत्रातील बॅंक कोटक महिंद्रा बॅंकेने एमसीएलआर 0.5 टक्‍क्‍यांनी कमी करून तो 9 टक्के केला होता. त्याअगोदर पंजाब नॅशनल बॅंकेने आपला एमसीएलआर 0.10 टक्‍क्‍यांनी कमी केला होता. आता पंजाब नॅशनल बॅंकेचा एमसीएलआर 8.45 टक्के आहे.

गेल्या पंधरवड्यात रिझर्व बॅंकेने रेपो दरात पाव टक्‍क्‍यांनी कपात केल्यानंतर स्टेट बॅंकेने 30 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावरील व्याजदरात कपात गेली होती. त्याच बरोबर महाराष्ट्र बॅंकेने काही कर्जावरील व्याजदरात कपात केलेली आहे. आगामी काळात इतर बॅंका विविध कर्जावरील व्याजदरात कपात करण्याची शक्‍यता आहे.

तसा आग्रह रिझर्व बॅंकेने केला आहे. यावर व्यावसाईक बॅंका आणि रिझर्व बॅंकेदरम्यान चर्चा झाली आहे. मात्र, दीर्घ पडल्यात विविध बॅंकांना आपल्या ठेवीवरील व्याजदरात कपात करावी लागणार आहे. तरच त्यांना खऱ्या अर्थाने कर्जावरील व्याजदरात कपात करता येईल. महागाई कमी असल्यामुळे रिझर्व बॅंकेने रेपो दरात कपात केली आहे. त्याचबरोबर या वर्षात रिझर्व बॅंक आणखी दोन वेळा तरी व्याजदरात कपात करण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे कमी व्याजदराचे युग निर्माण होऊ लागले आहे. विकास दर केवळ 6.6 टक्‍क्‍यांवर आल्यामुळे कर्जाचे वितरण वाढावे याकरिता आगामी काळात मोठ्या प्रमाणात प्रयत्न होण्याची शक्‍यता आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)