“क्‍यार’ वादळाची तीव्रता घटली, तरीही राज्यात ठिकठिकाणी पाऊस

पुणे – अरबी समुद्रातील “क्‍यार’ वादळाने बाष्प ओढून नेल्याने राज्याच्या अनेक भागात पावसाने उघडीप दिली आहे. दिवसभर उन्हाचा चटका वाढल्याने स्थानिक वातावरणात बदल होत असून ढगांची निर्मिती होत आहे. सायंकाळी किंवा रात्री उशिरा या भागात वादळी वारे मेघगर्जना विजांचा आणि गारांसह पाऊस पडत आहे.

अरबी समुद्रात असलेले क्‍यार महावादळ ओमनच्या किनाऱ्याकडे सरकले आहे. या प्रणालीची तीव्रता कमी होऊ लागली असून मुंबईपासून पश्‍चिमेकडे 990 किलोमीटर अंतरावर अतितीव्र चक्रीवादळ घोंघावत आहे. ओमनच्या दिशेने जाताना वादळाची तीव्रता आणखी कमी होणार आहे.

दरम्यान, केरळ किनाऱ्यालगत असलेल्या कोमोरीन येथे कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती झाली आहे. बुधवारपर्यंत या क्षेत्राची तीव्रता वाढत असून लक्षद्वीप बेटाजवळ कमी तीव्रतेचे वादळ तयार होण्याचे संकेत आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आगामी दोन दिवस हवामान कोरडे राहून त्यानंतर पुुन्हा वातावरण बिघडण्याची शक्‍यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.