सरन्यायाधीशाविरोधातील कारस्थानाची चौकशी करणार

सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार

नवी दिल्ली – सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या विरोधात होत असलेल्या कारस्थानाची सीबीआयकडून चौकशी करण्याच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी करण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र या प्रकरणावर तातडीने सुनावणी करण्याची आवश्‍यकता नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

ऍड. एम.एल शर्मा यांनी या संदर्भात तातडीने सुनावणी करण्याची मागणीची याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केली होती. लैंगिक शोषणाचे खोटे आरोप करून सरन्यायाधीशांची प्रतिमा मलीन करण्याचे कारस्थान केले गेले असल्याचा दावा या याचिकेमध्ये करण्यात आला आहे. आपल्या याचिकेवर 8 मे पूर्वी सूनावणी करण्यात यावी, अशी विनंती ऍड. शर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयाला केली आहे. सरन्यायाधीशांवरील लैंगिक शोषणाच्या आरोपांची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाच्या ज्या पिठासमोर झाली आहे, त्याच पिठासमोर कारस्थानाबाबतच्या याचिकेही सुनावणी करण्यात यावी, अशीही विनंती ऍड. शर्मा यांनी केली आहे.

ऍड. शर्मा यांनी आपल्या जनहित याचिकेमध्ये सामाजिक कार्यकर्ते आणि विधीज्ञ प्रशांत भूषण, शांती भूषण कामिनी जैसवाल, वृंदा ग्रोवर, इंदिरा जयसिंह, नीना गुप्ता भसीन आणि दुष्यंत दवे यांना प्रतिवादी केले आहे. यापैकी काही वकिलांची कृती न्यायालयाचा अवमान करणारी असून सरन्यायाधीशांना बदनाम करण्यासाठी काही नियोजनबद्ध कारस्थान केले गेल्याचा आरोपही ऍड. शर्मा यांनी केला आहे. त्या कारस्थानांचा तपास सीबीआयद्वारे करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.