मुंबई : या आगीत होरपळलेल्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले होते, मात्र तीन रुग्णालयांनी उपचार करण्यास नकार दिल्याची धक्कादायक माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.
मसिना, व्होकहार्ड, रिलायन्स या रुग्णालयांनी उपचार नाकारले असे किशोरी पडणेकर यांनी सांगितले. या रुग्णालयाकडून उपचार का नाकारले याबाबत महापौरांनी स्पष्टीकरण मागवले आहे. ते स्पष्टीकरण आल्यानंतर समाधानकारक उत्तर नसेल तर या रुग्णलयांना कारवाईला सामोरे जावे लागेल, असे त्या म्हणाल्या.
मुंबई शहरातील एका वीस मजली इमारतीला आग लागण्याची घटना आज घडली. ही आग इमारतीच्या अठराव्या मजल्यावर लागली होती. सकाळी साडेसातच्या सुमारास ही आग ताडदेव भाटिया रुग्णालयाच्या बाजूच्या कमला या बहुमजली इमारतीला लागली होती. यामध्ये 7 जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी झाले आहेत.