Baba Siddique | उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री मुंबईत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर तिसरा आरोपी अद्याप फरार आहे. तिसऱ्या आरोपीच्या शोधासाठी गुन्हे शाखेची ४ पथकं राज्याबाहेर रवाना झाली आहे. यातील आता तिसऱ्या आरोपीची देखील ओळख पटली आहे.
करनैव सिंह आणि धर्मराज कश्यप अशी अटक केलेल्या दोन आरोपींची नावं आहेत. करनैल हा हरियाणा आणि धर्मराज हा यूपीचा रहिवाशी असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई क्राईम ब्रांच यूनिट 3 मध्ये दोन आरोपींना ठेवण्यात आलं असून, तिसरा आरोपी अद्याप फरार आहे. आरोपी मागील सप्टेंबर महिन्यापासून कुर्ल्यात भाड्याने खोली घेऊन राहत होते.
आरोपींनी गेल्या काही दिवसांपासून बाबा सिद्दीकी यांच्यावर पाळत ठेवली होती. फुलप्रूफ प्लान करून बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आल्याचं सिद्ध झालं आहे. आरोपींची आजच वैद्यकीय चाचणी करून न्यायालयात हजर केले जाणार आहे. गुन्हे शाखेची पथकं फरार आरोपींचा शोध घेत आहेत. तिन्ही आरोपींचं वय 28 पर्यंत असल्याची माहिती समोर येत आहे.
बाबा सिद्धीकींची हत्या कशी झाली?
बाबा सिद्धीकी हे शनिवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास वांद्रे परिसरात होते. तिथे त्यांचा मुलगा आमदार झिशान सिद्धीकी यांचे ऑफिस आहे. त्यांची भेट घेऊन बाबा सिद्धीकी घरी निघाले. त्यावेळी वांद्रेतील खेरवाडी जंक्शनच्या परिसरात गोळीबार तीन आरोपींनी त्यांच्यावर गोळीबार केला. Baba Siddique |
ज्या ठिकाणी हा गोळीबार झाला तेथील पथदिवे देखील बंद होते. तसेच या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे देखील नव्हते. याच गोष्टीचा फायदा घेऊन आरोपींनी दोन बंदुकीतून एकूण ६ गोळ्या झाडल्या. यातील तीन गोळ्या सिद्धीकी यांच्या छातीत घुसल्या. तर एक गोळी त्यांच्यासोबत असलेल्या व्यक्तीच्या पायाला लागली.
सिद्दिकी यांची कार बुलेटप्रुफ असूनही दोन गोळ्या गाडीच्या काचेतून आतमध्ये शिरल्या. त्यामुळे आरोपींकडे अत्याधुनिक बनावटीचे पिस्तूल असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. Baba Siddique |
आरोपींचा बिश्नोई गँगशी संबंध
बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करण्यात केलेल्या आरोपींचा बिश्नोई गँगशी संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. हे सर्व आरोपी बाबा सिद्दिकी यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून पाळत ठेवत होते.
हेही वाचा: