मानसिक अस्वास्थ्यामुळे ‘या’ भारतीय खेळाडूने घेतला क्रिकेटमधून ब्रेक

नवी दिल्ली : मागील आयपीएल टी-२० क्रिकेच मोसमात राजस्थान राॅयल्स संघातर्फे खेळणा-या आर्यमान बिर्ला या खेळाडूने मानसिक अस्वास्थ्यामुळे अनिश्चित काळासाठी क्रिकेटमधून ब्रेक घेत असल्याचे जाहीर केले आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये मध्य प्रदेशकडून खेळणा-या २२ वर्षीय आर्यमानने शुक्रवारी रात्री याबाबत सोशलमिडियाव्दारे माहिती दिली.
https://twitter.com/AryamanBirla/status/1208011551552110593?s=19
आर्यमान याने २०१७ मध्ये मध्यप्रदेश रणजी संघात पदार्पण केलं होते. त्याने ९ प्रथम श्रेणी सामने आणि ४ लिस्ट ए सामने खेळले आहेत. तसेच सी.के.नायडू स्पर्धेमध्ये त्याने ३ शतक आणि ९ अर्धशतकांसह ६०२ धावा पटकावल्या आहेत.
आर्यमनचा २०१८ ते २०२० या दोन सत्रात राजस्थान राॅयल्सच्या ताफ्यात समावेश होता पण त्याला अंतिम ११ मध्ये खेळण्याची संधी मिळाली नव्हती. यापूर्वी आॅस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल, निक मेडिनसन आणि विल पुकोवस्की यांनी सुध्दा मानसिक अस्वास्थ्यामुळे अनिश्चित काळासाठी क्रिकेटमधून ब्रेक घेतला होता.





