दुबई : आयसीसीने नुकतीच(मंगळवारी) वनडे क्रिकेटसाठीची क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत भारताचा कर्णधार विराट कोहली आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या दोघांनी आपले क्रमवारीतील अव्वल स्थान कायम ठेवले आहे. आयसीसीच्या फलंदाजीच्या यादीत विराट कोहली ८९५ पॉईंटसह अव्वलस्थानी कायम आहे. विराटनंतर भारताचा उपकर्णधार व सलामीवीर रोहित शर्मा दुस-या स्थानी कायम आहे.
बुमराह गोलंदाजाच्या यादीमध्ये ७९७ पॉईंटसह पहिल्या क्रमांकावर कायम आहे. बुमराहनंतर न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट दुस-या स्थानी आहे. बुमराह आणि बोल्ट यांच्यामध्ये ५७ पाॅईटचा फरक आहे. सध्या बुमराह पाठदुखीमुळे संघाच्या बाहेर आहे. अफगाणिस्तानचा गोलंदाज मुजीब उर रहमान याने वेस्ट इंडिजविरूध्द झालेल्या मालिकेत चांगली कामगिरी करत दोन स्थानाची झेप घेत तिसरे स्थान पटकावले आहे. मुजीबचे ७०७ पाॅईट आहेत. दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज कागिसो रबाडा चौथ्या तर आॅस्ट्रेलियाचा पैट कमिन्स पाचव्या स्थानी आहे.
Mujeeb ur Rahman climbs two spots to No.3 on the @MRFWorldwide ICC ODI rankings for bowlers after solid performances against West Indies ?
Full rankings ? https://t.co/su8ZcgGSZr pic.twitter.com/JKzmJ3CdHB
— ICC (@ICC) November 12, 2019
दरम्यान, भारतीय संघाने नुकतीच बांगलादेश विरूध्दची तीन सामन्याची टी-२० मालिका २-१ ने जिंकली आहे. त्यानंतर भारतीय संघ बांगलादेशविरूध्द दोन सामन्याची कसोटी मालिका खेळणार आहे. या कसोटी मालिकेनंतर भारतीय संघ वेस्ट इंडिजविरूध्द तीन सामन्याची वनडे मालिका खेळणार आहे.