युनायटेड नेशन्स कडून भारतीय हवामान खात्याची प्रशंसा  

नवी दिल्ली/संयुक्त राष्ट्र – बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे तयार झालेले “फणी’ या चक्रिवादळाची अत्यंत अचूक अशी माहिती भारतीय हवामान खात्याने दिल्याने, युनायटेड नेशन्स आपत्ती विभागाने भारतीय हवामान खात्याची प्रशंसा केली आहे. भारतीय हवामान खात्याने अत्यंत तीव्र अशा फणी चक्रिवादळाची अचूक माहिती दिल्याने जीवघेणे नुकसान कमी केले असल्याचे युनायटेड नेशन्सने म्हंटले आहे. हवामानाचा अंदाज वेळेत आणि बरोबर वर्तवल्यामुळे सामान्य जनजीवन आणि जीवित हानी कमी झाल्याचे युनायटेड नेशन्सने म्हणत भारतीय हवामान खात्याचा एकप्रकारे गौरव केला आहे.

भारतीय हवामान खात्याने अत्यंत तीव्र अशा फणी चक्रिवादळाची पूर्वमाहिती दिल्याने लाखो लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. तर नागरी जनजीवन यांना कमी विस्कळीत होऊन देत कोणतीही मोठी हानी टाळण्यात प्रशासनाला यश मिळाले. त्यामुळेच युनायटेड नेशन्स आपत्ती विभागाने भारतीय हवामान खात्याची प्रशंसा केली आहे.

दरम्यान, फणी वादळामुळे सावधगिरीचा उपाय म्हणून हवाई तसेच रेल्वे वाहतूक पूर्णपणे थांबविण्यात आली होती.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.