भारतीय हवाई दलाच्या कार्यालयातून ‘राफेल’संबंधी कागदपत्रांच्या चोरीचा प्रयत्न

फ्रांस – भारतीय हवाई दलाच्या फ्रांसमधील पॅरिस येथे असणाऱ्या कार्यालयामध्ये रविवारी रात्री हेरगिरी करण्याचा प्रयत्न झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. भारताने फ्रान्सकडून विकत घेतलेल्या लढाऊ विमान राफेल बाबतची गुप्त कागदपत्र चोरण्याचा हा प्रयत्न असल्याचे मानण्यात येत आहे. याबाबत भारतीय हवाई दलातील सूत्रांनी एएनआय या प्रसिद्ध वृत्तसंस्थेला माहिती दिली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “अज्ञात इसमांनी फ्रान्समधील पॅरिस शहरामध्ये असणाऱ्या भारतीय हवाई दलाच्या राफेल  मॅनेजमेंट टीमच्या कार्यालयामध्ये शिरकाव केल्याची घटना उघड झाली आहे. मात्र कार्यालयातून हार्ड-डिस्क अथवा कागदपत्र चोरीला गेली नसून कार्यालयामध्ये शिरकार करणाऱ्यांच्या नेमक्या उद्दिष्टाबाबत सध्या तपास सुरु आहे.”

भारतीय हवाई दलाच्या राफेल मॅनेजमेंट टीमच्या कार्यालयामध्ये केवळ राफेल संबंधातील कागदपत्रे ठेवण्यात आली असून इथं पैसे अथवा इतर मौल्यवान वस्तू ठेवल्या जात नसल्याने या कार्यालयात शिरकाव करणाऱ्यांचा हेतू राफेल संबंधित कागदपत्र चोरण्याचाच असल्याचे मानला जात आहे.

एका ग्रुप ग्रुप कॅप्टन-रँक ऑफिसरच्या नेतृत्वाखालील भारतीय हवाई दलाची राफेल मॅनेजमेंट टीम सध्या पॅरिस येथे असून या टीमद्वारे राफेल विमानांबाबतीतील विविध घडामोडींवर लक्ष ठेवले जाते. यामध्ये भारतीय कर्मचाऱ्यांना राफेल विमानांच्या देखभालीचे व हे विमान उडविण्याचे प्रशिक्षण देणे, राफेल विमानांच्या निर्मितीच्या वेळांचे पालन करणे इत्यादी गोष्टींचा समावेश होतो.

भारतीय हवाई दलातील सूत्रांनी याबाबतची माहिती भारतीय संरक्षण मंत्रालयाला दिल्याचे सांगितले आहे.

 

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.