गॅस सिलेंडरचे दर 15.50 रुपयांनी वाढले
नवी दिल्ली : विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या किंमतीत पुन्हा वाढ झाली आहे. रविवारी तेलाच्या किंमतीत ववाढ झाल्याने गॅस सिलेंडरचे दर 15.50 रुपयांनी वाढवले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी कात्री लागणार असल्याचे दिसत आहे. देशातील सर्वात मोठी तेलकंपनी इंडीयन ऑईल कॉर्पोरेशनने याविषयी माहिती दिली आहे. दिल्लीत आजपासून विनाअनुदानित सिलेंडरची किंमत 590 असणार आहे. दरम्यान, ऑगस्टमध्ये याच सिलेंडरची किंमत ही 547.50 रुपये एवढी होती. परंतु, अचानक सिंलेडरची किंमत वाढल्याने गृहिणींचे बजेट कोलमडणार असल्याचे दिसत आहे.
देशाची आर्थिक राजधानी मुंबईत सिलेंडरचे दर 546 वरून 562 वर गेले आहेत. तर तिकडे 590 रुपयांना मिळणारा सिलेंडर 606 रुपयांना मिळणार आहे. तसेच कोलकातामध्ये 601 रूपयांना मिळणारा सिलेंडर 616.20 रुपयांत मिळणार आहे. वाढलेले दर हे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणारे आहेत असेच दिसत आहे.