खोटी तक्रार करून शासकीय कामात अडथळा आणल्याचा शेवगावात घडला प्रकार

स्वस्त धान्याचा अधिकृत टेम्पो चोरीचा असल्याची तक्रार देऊन तक्रारदार गायब

शेवगाव ( प्रतिनिधी ) : स्वस्त धान्याचा अधिकृत टेम्पो चोरीचा असल्याचा संशय दाखवून तो मुद्दाम आडवून तक्रार करण्याचा प्रकार आज रविवारी खानापुर येथे घडला. त्यावर  महसुल, पोलिस , पुरवठा विभागाने या मालाची तपासणी केली असता तो अधिकृत व पावत्याप्रमाणे बरोबर असल्याचे निदर्शनास आले. याबाबत वाहन अडवून मोबाईलवर तक्रार करणाऱ्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश तहसीलदार यांनी दिले आहेत .

खानापुर व दहिफळ या स्वस्त धान्य दुकानात लाभार्थ्यांना धान्य वाटप करण्यासाठी एम.एच.१६ ए.इ. ३३५० टेम्पोतुन रविवारी दुपारी धान्य नेत असता हे धान्य काळ्या बाजारात विक्रीस जात असल्याचा दावा करुन काही व्यक्तींनी केला. टेम्पोला  खानापुर गावाजवळ अडवले व कुठलीही सविस्तर माहिती न घेता त्यावर तहसीलदाराकडे कारवाईचा आग्रह धरला. त्यामुळे  पोलीसासह वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती मिळताच पोलीस प्रशासन व पुरवठा विभाग घटनास्थळी दाखल झाले.

तहसीलदार अर्चना पागीरे यांनी खात्री करण्यासाठी टेम्पो पुन्हा शेवगावातील गोदामाकडे बोलाविला . सायंकाळी ६ वाजता  तहसीलदार अर्चना पागीरे, नायब  तहसीलदार मयुर बेरड,पुरवठा निरिक्षक पवनसिंग बिघोत,अव्वल कारकुन संदिप चितांमणी गोदामकिपर सोमनाथ आव्हाड यांच्यासह सुट्टीवर असलेले हमाल उपस्थित होते.

सर्व कागदपत्राची तपासणी करून गोदामात धान्यांची मोजदाद केली असता हे प्रधानमंत्री योजनेतील ५२ क्विंटल ५० किलो गहू, तांदुळ असे १०५  गोण्या धान्य अधिकृतरित्या खानापुर येथे ४४ क्विंटल धान्य व जुने दहिफळ येथे प्रधानमंत्री योजनेतील साडेआठ क्विंटल तांदुळ स्वस्त धान्य दुकानात जात होते तसेच सर्व धान्य बरोबर असल्याची खात्री झाल्याने तक्रार करणाऱ्या व्यक्तीचा हिरमोड झाला. यावेळी  पोलीसांनी सुचना देवूनही तक्रारदार याठिकाणी उपस्थित राहिले नाही.

पुरवठा प्रतिनिधी ,गोदाम प्रमुख, चालक यांचे जबाब घेऊन शासकीय कामात अडथळा आणून अनाधिकाराने शिस्तभंग केल्याने टेम्पो अडवणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश तहसीलदार पागीरे यांनी दिले .

आज रविवार सुट्टीचा दिवस असतांना तक्रार दाराने  भ्रमणद्वारे तक्रार करून महसूल विभाग, पोलिस प्रशासन, ग्रामस्य, पत्रकार सर्वांना कामाला लावले . मात्र प्रत्यक्षात टेम्पो शेवगावमधील गोदामात चेक करण्यास नेला तेव्हा तक्रारदार मात्र गायब झाले होते .

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.